`राणे कुुटंबांची पार्श्वभूमी गुंडगिरीची; माझ्या जिवाला धोका`

राणे आणि सरदेसाई यांच्यातील वाद न्यायालयात जाण्याची चिन्हे
varun sardesai
varun sardesai

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, अशी माहिती युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी सुसंस्कृत असून आमचे कुटुंब उच्च शिक्षित आहे. नितेश यांनी माझ्यावर लावलेल्या आरोपाचा मी तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. 

सरदेसाई पुढे बोलताना म्हणाले, ``राणे कुटुंबियांची माहिती सर्वश्रुत असून बेछूट आरोपांची परंपरा त्यांच्याकडे आहे. त्यांना आजपर्यंत कुणीही गांभीर्याने घेतले नसून पुढेही घेणार नाहीत. त्यांच्या आरोपांची सोशल मिडियातही खिल्ली उडविली जाते.  राणे कुटुंबियांवर विविध गुन्हेही दाखल आहेत. नितेश यांनी माझ्यावर खंडणीचा गंभीर आरोप केला असून हा आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझ्या राजकीय कारकिर्दीवर गदा येऊ शकते. त्यामुळेच याबाबत मी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या आरोपाबद्दल माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे.``

राणे कुटुंबाकडून मला गेले वर्षभर टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्यानेच सरकारने मला सुरक्षा व्यवस्था दिली असावी, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. मला एक्स दर्जाची सुरक्षा असून एक पोलिस माझ्यासोबत असतो, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. त्यांनी दहावी-बारावीचे गुण आपले शैक्षणिक गुणवत्ताही सांगून राणे कुटुंब कसे आहे, हे पण सांगितले. खुद्द देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राणेंवर केलेले आरोप आजही रेकाॅडर्वर असल्याचे त्यांनी नमूद केले. 

तत्पूर्वी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत सरदेसाई यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले होते. वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंशी त्यांचा संबंध जोडत सरदेसाई आणि वाझे यांचे व्हाटस अप चॅट, सीडीआर शोधून घेऊन त्याच्या चौकशीची मागणी केली. वाझेंनी आयपीएलचे बेटिंग करणाऱ्यांना धमकावले होते. त्यांच्यावरील छापा किंवा अटक टाळायची असेल तर तुम्हाला 150 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला होता. त्यावरून सरदेसाई आणि वाझे यांचे संभाषण झाल्याचा दावा राणेंनी आरोपात केला होता.

राणे आणि सरदेसाई यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. विधानसभेतही सरदेसाई यांच्याबद्दल नितेश यांनी उल्लेख केला होता. आतापर्यंत सरदेसाई यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आजच्या आरोपानंतर राणेंना त्यांनी आव्हान दिले आहे. राणेंकडून माफी त्यांनी मागितली असली तरी ही राजकीय लढाई आता न्यायालयातही लढली जाण्याची शक्यता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com