टोमॅटो निर्यात खुलीचं, केंद्राला प्रस्ताव पाठवावा : भारती पवार

राज्याला जो तोटा येईल त्याचा ५० टक्के भार आता केंद्र सरकार उचलणार आहे.
3Sarkarnama_20Banner_20_289_29_25.jpg
3Sarkarnama_20Banner_20_289_29_25.jpg

नाशिक : टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं एकीकडे बळीराजा लाल चिखल करीत आहेत, तर तिकडे टोमॅटो खरेदीवरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगताना दिसत आहे.. कारण एमआयएस योजनेंतर्गत राज्य सरकारनं टोमॅटो खरेदी करावं आणि त्याची विक्री करावी, असा पर्याय केंद्रानं सुचवला आहे. 

या खरेदी-विक्री व्यवहारात राज्याला जो तोटा येईल त्याचा ५० टक्के भार आता केंद्र सरकार उचलणार आहे. याबाबत राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली. पवार Bharti Pawar यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी टोमॅटो निर्यात बंद केली नसल्याचंही स्पष्ट केलं.

डॉ. भारती पवार म्हणाल्या की,  मागील दोन वर्षे सातत्याने ज्या प्रमाणे दर भेटला त्याच पार्श्वभूमीवर केंद्र आजही निर्यात खुली करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र कोरोना काळ असल्याने आणि इतर देशांत मागणी नसल्याने आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्यात खुली कशी होईल याबाबत काम करत आहोत. आणि शेतकऱ्यांना फायदा कसा होईल या दृष्टीने काम सुरू आहे. मागील दोन वर्षा प्रमाणे यावर्षी देखील जास्त भाव कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे. 

टोमॅटो निर्यात tomato exports खुली आहे, निर्यात बंद नाही, जिथे टोमॅटोचे भाव कमी आहे,  तेथे MIS स्कीम राबवून तात्काळ नोटिफिकेशन काढले आहे. राज्यांनी तात्काळ केंद्राकडे याबाबतचे प्रस्ताव पाठवावे, यामध्ये राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र पन्नास टक्के वाटा उचलणार आहे. केंद्रिय कृषी मंत्री तोमर यांच्याशी संपर्क करून चर्चा झाली. त्यांनी राज्याला पत्र देण्याचे सांगितले आहे. राज्यांना विंनंती की त्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवावे. केंद्राचे धोरण हे शेतकऱ्यांसाठी आहे, असे भारती पवार म्हणाल्या. 
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com