राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत केलेली जमावबंदी राजकीय

राज्याला बंदीवान करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे.
1Sarkarnaa_20Banner_20_2874_29.jpg
1Sarkarnaa_20Banner_20_2874_29.jpg

मुंबई : संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. राणे हे आज सिंधुदुर्ग येथे आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग देखील करण्यात येत आहे. यावर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

आशिष शेलार म्हणाले की, नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा (Janashirwad Yatra)  सिंधुदुर्गात (Sindhurg) पोहचली. राणे सिंधुदुर्गात दाखल झाल्यापासून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'सिंधुदुर्गात केलेली जमावबंदी राजकीय,’ असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ‘जमावबंदीचे आदेश कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी होती की राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी होते. राज्याला बंदीवान करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. त्यांच्याविरोधातील हा जनक्षोभ आहे. राणे यांच्या प्रेमामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.

''सत्तेत बसलेल्या शिवसेनेला काही संयम आणि मर्यादा ठेवाव्या लागतील. काही गोष्टी सहन कराव्या लागतील, म्हणून ते असहिष्णूतेचे जनक आहेत. 'कानशिलात लगावणे' या वाक्यात जर तरचा मुद्दा होता त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेतून एका संयमित व्यक्तीसोबत राहून संकूचित वृत्तीचे दर्शन शिवसेनेने केले आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

शिवसेनेचे अनेक नाराज आमदार माझ्या संपर्कात
रत्नागिरी : ‘‘खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत शिवसेनेला बुडवणार आहेत. शिवसेनेत नाराज असलेले अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. भविष्यात महाराष्ट्रात आमचेच सरकार असेल. राणेंच्या पाठीमागे लागू नका, मी आत्ता थोडे बोलतोय, बोलायला लागलो तर ते तुम्हाला परवडणार नाही,’’ असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिला. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मी रत्नागिरी दौऱ्यावर असताना माझ्यावर केलेली कारवाई कायदेशीर नाही. जबरदस्तीने ती करण्यात आली. सत्तेची मस्ती दाखविण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कारवाई करा; पण कायदेशीर करा. कायद्याबाहेर जाऊन कराल तर सामोरे जावे लागेल, असे मंत्री राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. या वेळी भाजप नेते आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण, नीलेश राणे, जठार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com