ठाकरे सरकार CBI च्या अधिकाऱ्यांना धमकावतयं..

सीबीआय त्यांच्या तपासाच्या कक्षा ओलांडत आहे, असा आरोपही प्रतिज्ञापत्रात केला आहे.
ठाकरे सरकार CBI च्या अधिकाऱ्यांना धमकावतयं..
2udhav_201_2.jpg

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या सीबीआय तपासात राज्य सरकार सीबीआयला CBI सहकार्य करण्यास तयार आहे; मात्र या प्रकरणाशी संबंध नसलेल्या कागदपत्रांची मागणी सीबीआय करीत आहे, असा दावा राज्य सरकारने Uddhav Thackeray मंगळवारी प्रतिज्ञापत्रात केला. सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. राज्य सरकार तपासात सहकार्य करीत नसून अधिकाऱ्यांना धमकावत आहे, अशी तक्रार यात केली आहे. या आरोपांवर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने काल प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

सीबीआय त्यांच्या तपासाच्या कक्षा ओलांडत आहे, असा आरोपही प्रतिज्ञापत्रात केला आहे. राज्य सरकार उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडून गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी प्रतिज्ञापत्र केले आहे.

माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करण्यासाठी राज्य सरकारकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे; मात्र ही कागदपत्रे देण्यासाठी पोलिस विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. राज्य सरकार तपासात सहकार्य करीत नसून अधिकाऱ्यांना धमकावत आहे, अशी तक्रार यात केली आहे. या आरोपांवर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने याबाबत २० ऑगस्टला सुनावणी निश्चित केली आहे. तसेच राज्य सरकार न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार्य करत नसल्याचे उघड झाल्यास आम्ही पुढील सुनावणीत त्यावर मत व्यक्त करू, असा इशाराही खंडपीठाने दिला आहे.

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालिम म्हणूनच भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली येत्या १९ ऑगस्टपासून निघाणाऱ्या जन आर्शीवाद यात्रेकडे  jan ashirwad yatra पाहिले जात आहे.

Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.