राणेंना पक्षश्रेष्ठींनी दिलं 'टार्गेट' ; शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी व्यूहरचना

मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे.निवडणुकीआधीच शिवसेनेला जेरीस आणण्याची भाजपची व्यूहरचना आहे.
34Sarkarnama_20Banner_20_2833_29_6_0.jpg
34Sarkarnama_20Banner_20_2833_29_6_0.jpg

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालिम म्हणूनच भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून निघाणाऱ्या जन आर्शीवाद यात्रेकडे  jan ashirwad yatra पाहिले जात आहे. त्यासाठी सर्वच पातळ्यांवर तयारी केली आहे.

राज्यात युतीऐवजी महाविकास आघाडी करीत, शिवसेनेने सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप नेतृत्वाने रणनीती आखली आहे. त्यातही मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे. त्यादृष्टीने नेत्यांची विशेष समिती स्थापून, निवडणुकीआधीच शिवसेनेला जेरीस आणण्याची भाजपची व्यूहरचना आहे. 

शिवसेनेच्या गडाला अर्थात, मुंबई महापालिकेतील सत्तेला सुरूंग लावून, ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दीडशेहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा या पक्षाच्या नेतृत्वाचा प्रयत्न आहे. हे 'टार्गेट' साध्य करण्यासाठी तयारी चालविली असून, शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यापासून ऐन निवडणुकीत साम, दाम दंडाचा वापर करून सत्ता आणण्याचा निर्धार भाजप नेत्यांचा आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे विरोधक मानले जाणारे नारायण राणे narayan rane यांच्यावर सोपविली आहे. 

जयंतराव, आपण एकत्र लढू आणि कॉग्रेसची जिरवू :  भाजपच्या माजी आमदाराची आँफर
नव्या वर्षाच्या सुरवातीला म्हणजे, येत्या फेब्रुवारीत निवडणुका होण्याच्या शक्यतेने राणे यांनाही भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने बळ दिले आहे.  मुंबईसह विविध महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नव्या मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यभरातील लोकांचे आर्शीवाद घेण्याचे नियोजन भाजपने केले आहे. या यात्रेचा प्रारंभही झाला आहे. पुढच्या निवडणुकांचा प्रचार म्हणूनच ही यात्रा काढण्यात येत असून, विशेषतः राणे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई आणि कोकणातील यात्रेवर भाजप नेत्यांचा भर आहे. यात्रेनिमित्त मुंबई फिरून वातावरण निर्मिती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

शिवसेनेला शह देण्याच्या हेतुनेच राणेंना केंद्रात कॅबिनेट मंत्री केल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळातील समावेशामुळे राणेही आणखीच आक्रमक झाले असून, शिवसेनेला हरविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यामुळे पढील निवडणुकीत मुंबईत महापालिकेत १५० हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा मनसुबा आहे.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com