444_20_285_29_0.jpg
444_20_285_29_0.jpg

ठाकरे सरकार-विरोधक संघर्ष वाढण्याची चिन्हे 

धर्मिक स्थळे न उघडण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे.

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने मंदिरे सुरू करा, अशी मागणी लावून धरत भाजपने ठाकरे सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शंखनाद करीत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते स्थानिक नेते आणि कार्यकर्ते  काल मंदिरांपुढे बसले होते. या मुद्यावरून आणखी आक्रमक होण्याचा इशारा भाजपने दिला आहे. तरीही मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने काळजी घेण्यास सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. तसेच, रुग्ण वाढल्यास नव्याने काही निर्बंध लादण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार दिला आहे. त्यामुळे मंदिरप्रश्‍नी सरकार ठाम आणि विरोधक आक्रमक झाल्याने संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

मंदिरे उघडण्यावरून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले असले तरी; धर्मिक स्थळे न उघडण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे. कोरोनाची तिसरी लाट, संभाव्य परिणाम आणि केंद्र सरकारच्या नव्या सूचनांकडे बोट दाखवून मंदिर बंदच राहतील, असे राज्य सरकारने पुन्हा सांगितले. ‘लोकांच्या जीवाचा विचार करून घाई केली जाणार नाही,' असे आरोग्य खाते आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याने एकाचवेळी स्पष्ट केले आहे.

मोदी विरुद्ध नितीश?  विरोधकांकडून सर्वमान्यता मिळेल!
राज्य आणि केंद्र सरकारकडून नव्या सूचना येऊन कोरोनाविरोधातील नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय विशेषत: मेळावा, बैठका, शिबिरे पदयात्रांमुळे गर्दी होऊन कोरोनाचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी आहे. या पार्श्वभूमीवर आता साथरोग कायद्याचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वागणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश सरकारने स्थानिक यंत्रणांना दिला आहे.

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढणार नाही, यासाठी उपाय करीत आहोत. त्यामुळेच आतापर्यंत बंद असलेल्या सोयी-सुविधा लगेचच खुल्या होणार नाहीत. संभाव्य धोक्याचा इशारा पाहता विशेषतः धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही विचार नाही.
राजेश टोपे, आरोग्य मंत्री


Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com