रायगडमध्ये 90 जणांना रेमडेसिव्हिरमुळे साईडइफेक्टस; इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे आदेश

कोरोना रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले अौषध रेमडेसिव्हिर संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
  ramadesivir .jpg
ramadesivir .jpg

रायगड : कोरोना रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले अौषध रेमडेसिव्हिर संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून ५०० कोविफोर इंजेक्शनचा पुरवठा झाला त्यापैकी 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन वापरण्यात आले होते. यापैकी 90 रुग्णांना या इंजेक्शनमुळे दुष्परिणाम जाणवल्याची माहिती समोर आली आहे.

या सगळ्या रुग्णांना इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. इतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्याने आता अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्रभावी ठरताना दिसून आले होते. मात्र, या घटनेमुळे आता रेमडेसिव्हिरच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा मोठ्याप्रमाणावर काळाबाजार होताना दिसत आहे.

या इंजेक्शनमुळे कोरोनाच्या रुग्णांना खात्रीशीररित्या फायदा होईलच असे नाही, हे डॉक्टरांनी वेळोवेळी सांगूनही अनेकजण रेमडेसिव्हिरच्या वापरासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com