भाजप मंत्र्याला शिवसेनेच्या माजी आमदाराकडून शुभेच्छा..

सुभाष भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशीही चर्चा आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-16T082718.083.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-16T082718.083.jpg

डोंबिवली : केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील  kapil patil यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्र आज काढली जाणार आहे. त्यामुळे भाजपकडून सर्व ठिकाणी बॅनरबाजी केली जात आहे. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी लावलेल्या बॅनरवर आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

सुभाष भोईर subhash bhoir यांनी विकास कामे करून सुद्धा  2019 सालच्या विधानसभा निवडणूकीत एबी फॉर्म देईन सुद्धा त्यांचे तिकीट कापले आणि रमेश म्हात्रे यांना तिकीट दिले. त्यामुळे ते शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि भोईर यांच्यात पटत नसल्याची चर्चा आहे आणि भोईर भाजपमध्ये  प्रवेश करणार आहेत अशीही चर्चा आहे. त्यामुळे हा बॅनर शुभेच्छा देणारा बॅनर आहे की, शिवसेनेचे माजी आमदारांनी काही राजकीय संकेत दिला आहे का हे येणाऱ्या काळात उघड होईल

भाजप च्या वतीने आज पासून पुढील ५ दिवस जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रात मंत्री पद स्वीकारलेले कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा ठाणे आणि पालघर जिल्ह्यात  जाणार आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास ठाण्यातील आनंद नगर चेक नाका येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. सकाळी 11 च्या सुमारास ठाण्यातील मासुंदा तलाव येथे असणाऱ्या छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कपिल पाटील पुष्पहार अर्पण करणार आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट, नौपाडा, घोडबंदर रोड येथून यात्रा टेम्भी नाका मार्गे कळवा, मुंब्रा या ठिकाणी जाणार आहे. १४९ किलोमीटर च्या या यात्रेत भजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

गडकरींच्या लेटरबॅाम्बनंतर शंभूराज देसाईंनी उचलले हे पाऊल 
पालघर केंद्रीय राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब  डॉ. भारती पवार  यांच्या नेतृत्वात आजपासून पालघरमध्ये जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होत आहे. पालघर भाजपच्या वतीने या यात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सकाळी हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून ही यात्रा पुढे मनोरच्या दिशेने निघणार आहे. पालघर मनोर मार्गे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत पुढे  दुपारी तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्राला भेट त्यानंतर विक्रमगड येथील रिव्हेरा कोविड सेंटरला भेट देत जव्हार, मोखाडा भेटी नंतर नाशिककडे ही यात्रा नाशिकच्या दिशेने निघणार आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com