Nitin Gadkari,Shambhuraj Desai .jpg
Nitin Gadkari,Shambhuraj Desai .jpg

गडकरींच्या लेटरबॅाम्बनंतर शंभूराज देसाईंनी उचलले हे पाऊल 

या पत्रात वाशिम मतदारसंघाचा उल्लेख असल्याने या मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वाशिम : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे करीत असलेल्या ठेकेदारांना शिवसेनेचे Shivsena काही पदाधिकारी धमकावत आहेत आणि काम बंद करण्यास सांगत आहेत. सुरू असलेली कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यात आल्यास महाराष्ट्राचे व जनतेचे नुकसान होईल. आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पाठविले आहे. गृहराज्यमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. (Shambhuraj Desai said on Nitin Gadkari's letter) 

देसाई यांनी शनिवारी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच रस्तेविकास महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये कोणीही रस्ते कामात अडथळा केला नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे मला मिळालेल्या माहितीनुसार तसे काही झाले नसल्याचे समजले, असे देसाई म्हणाले. मी आता या विषयी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना पत्र लिहुन काळविणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय यापुढे विकास कामात कोणीही अडथळा निर्माण केला, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. असल्याचे देसाई यांनी सांगितले.   

या पत्रात वाशिम मतदार संघाचा उल्लेख असल्याने या मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाशिम जिल्ह्यातील 90 टक्के नॅशनल हायवे चे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात मी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात मला कुठलाही विचारणा झाली नाही. नॅशनल हायवेचा विषय असल्यामुळे मी गडकरी यांना भेटून सगळ्या गोष्टी सांगणार, असल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले.   

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात गडकरी पत्रात म्हणतात, राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गांचे काम करताना अडचणी येत आहेत. तसेच काही ठिकाणचे स्थानिक नेते या कामात अडथळा आणत आहेत. त्यांनी हे पत्र २७ जुलैला लिहिले असून अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबद्दल लिहिले आहे. 

त्याबरोबर मालेगाव, मेहकर, सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच इतरही काही रस्ते त्यांनी नमूद केले आहे. तिकडचे स्थानिक नेते मंडळी या कामामध्ये अडथळा आणत असून स्थानिक पातळीच्या राजकारण आडवे येत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील सेनेचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे गडकरींनी सांगितले आहे. Edited By -  Amol Jaybhaye  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com