नितेश राणेंच्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसैनिकांचा राडा! - Shiv Sena attempt to burn Nitesh Rane statue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नितेश राणेंच्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसैनिकांचा राडा!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

नितेश राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.  

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे नेते, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली.  आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. आणि विधानसभेच्या बाहेरच प्रतिविधानसभा भरवली होती. याठिकाणी भाषण करीत असताना भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. याला शिवसैनिकांनी उत्तर दिलं आहे.  Shiv Sena attempt to burn Nitesh Rane statue
 
भाजप आमदार नितेश राणे यांनी काल विधानसभेमध्ये भाजपकडून भरवण्यात आलेल्या प्रति विधानसभेत भाषण करत असताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहेत का ?  यासाठी डीएनए टेस्ट करावी लागेल असं आक्षेपार्ह विधान केलं होतं .  याला उत्तर म्हणून शिवडी विधानसभा शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आज भारतमाता सिनेमा समोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी नितेश राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.  

 
नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी आज सकाळी भारतमाता सिनेमासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावं, असं प्रत्युत्तर नितेश राणेंना दिलं.

शब्द मागे घेतो ! आदित्य ठाकरेंवर बोलून नितेश राणे तोंडघशी  

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा तोल गेला. मंगळवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते. यानंतर मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. त्यानंतर नितेश राणे म्हणाले की भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो. ठाकरेंवरील आत्तापर्यंतच्या टीका पाहता, राणेंकडून दिलगिरीचा प्रकार पहिल्यांदाच असावा असे म्हटले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख