राज्यपालांची भूमिका राजकीय ; त्यांनी प्यादं बनू नये

राज्यपाल कोश्यारी यांच्याभूमिकेवर संजय राऊत यांनीहल्लाबोल केला.
00raut_20koshyari_2.jpg
00raut_20koshyari_2.jpg

मुंबई : बारा आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यात राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल यांनी बारा आमदारांबाबत घेतलेला भूमिकेवर राऊतांनी हल्लाबोल केला आहे. राऊत हे माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, बारा आमदारांची रखडेलेली नियुक्ती गा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपालांवर राजकीय पक्षाचा दबाब आहे. ते स्वतःच्या मर्जीने या गोष्टी करीत नाही. हा दबाब कोणाचा आहे. हे आपल्याला माहित आहे. त्यांनी राजकारणातील प्यादे बनू नये. घटनेनुसार राज्यांच्या अधिकारावर कॅबिनेटच्या अधिकारावर जर ते अतिक्रमण करत असतील तर देशाच्या अधिकारांवर संघराज्या वर हल्ला आहे. बारा आमदाराबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे. 

गृहमंत्री अमित शहा यांनी जसं 370 कलम हटवलं आणि खूप मोठा इतिहास केला. तसं महाराष्ट्रामध्ये देखील जे बारा आमदारांवर जी राजकीय बंदी घातलेली आहे ती त्यांनी उठवावी, असे राऊत यांनी सांगितले. यूपीएबाबतच्या भूमिकेवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, कशाला भूमिका स्पष्ट करायला हवी, भूमिका स्पष्ट करण्याचं कारण काय, अनेक पक्ष असे आहेत, जे कुठेच नाहीत, पण ते भाजपबरोबरही नाहीत. त्यांची कुठेना कुठे तरी वेगळ्या पक्षाबरोबर आघाडी आहे, आणि ती त्या त्या राज्याची व्यवस्था सरकार चालविण्याची निर्माण केलेली आहे.  

मोठी घडामोड : उच्च न्यायालयाने निकाल दिला अन् काही तासांतच शहांच्या भेटीला राज्यपाल
 मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Assembly) राज्यपालनियुक्त 12 जागांबाबत उच्च न्यायालयाने (High Court) निकाल दिल्यानंतर काही तासांतच मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांनी कालच (ता.13) तातडीने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने राज्यपालांना 12 जागांबाबत ठराविक मुदतीत निर्णय घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शहांची भेट घेतली असली तरी राजभवनाने मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com