पटोलेंना केंद्र सरकार म्हणायचं होतं, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला! - Regarding Nana Patole statement, H.K. Patil explanation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

पटोलेंना केंद्र सरकार म्हणायचं होतं, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील H. K. Patil यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाटील म्हणाले की, पटोलेंना केंद्र सरकार म्हणायचं होतं, पण त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. त्यांनी यापूर्वी खुलासा केला आहे. Regarding Nana Patole statement, H.K. Patil explanation

काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची आज बैठक झाली. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. जिल्हा पातळीकर पक्षाच्या पूनर्बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला. 

एच. के. पाटील म्हणाले, ''ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी केंद्र सरकारनं डेटा उपलब्ध करुन द्यावा, अशी आमची मागणी आहे. आगामी काळात २४ जिल्हा परिषद, १४४ नगरपालिका, २२ पालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस तयारी करणार आहे.'' विधानसभा अध्यक्ष निवडणूकीबाबत पाटील म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद हे आमच्याकडे आहे. कोरोनामुळे सरकारने ही निवडणूक पुढे ढकलली आहे,'' असे पाटील म्हणाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील मेळाव्यात बोलताना केला आहे. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा दावा पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असही नाना पटोले म्हणाले आहेत.  “मी बोललो तर चूक आणि इतरांनी हे वक्तव्य केलं तर ते योग्य? हे माझं वक्तव्य आहे."  

प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ ; राजू राव याचा जबाब ठरणार महत्वाचा
   
मुंबई  : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करीत आहे. हिरेन हत्येप्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर शर्मा यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची  NIA कडून चौकशी करण्यात येत आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख