प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ ; राजू राव याचा जबाब ठरणार महत्वाचा - masukh hiren murder case pradeep sharma nia mumbai police | Politics Marathi News - Sarkarnama

प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ ; राजू राव याचा जबाब ठरणार महत्वाचा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

शर्मा यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.

मुंबई  : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करीत आहे. हिरेन हत्येप्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर शर्मा यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची  NIA कडून चौकशी करण्यात येत आहे.  masukh hiren murder case pradeep sharma nia mumbai police

आज एनआयएने शर्मा यांचा निकटवर्तीय सायन येथील व्यापारी राजू राव याला NIA ने चौकशीसाठी ऑफिसला बोलवले आहे. सध्या त्याची चैाकशी सुरु आहे.  मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर आरोपी संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोठिकुरी आणि मनिष सोनी हे नेपाळ येथे गेले होते. या चारही आरोपींना नेपाळला जाण्यासाठी राजू राव याने मदत केली असल्याची माहिती एनआयएला तपासात मिळाली आहे. 

राजू राव याने आज चैाकशीत सांगितलं की, या चारही जणांची नेपाळला जाण्याची व्यवस्था शर्मा यांच्या सांगण्यावरुन केली होती. पण या चारही जणांवर असलेल्या आरोपांबाबत मला माहिती नव्हती, असे राजू राव याने सांगितले. 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राजू राव यांचा जबाब महत्वाचा ठरु शकतो. या प्रकरणात एनआयए राजू राव यांना साक्षीदार करु शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली. हिरेन हत्या प्रकरणात शर्मा यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शर्मा यांच्यावर आहे.  

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पूत्र सलिल ईडीच्या रडारवर 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख यांना ईडीकडून लवकरच समन्स जाण्याची शक्यता आहे. सलील देशमुख यांच्या कंपनीने उरण तालुक्यात खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीचा तपास ईडीने सुरू केला आहे.  ईडीकडून सुरू असलेल्या तपासात जमीन खरेदी करणारी कंपनी ही सलील देशमुख चालवत असल्याचं समोर आले आहे.  त्याअनुषंगाने लवकरच त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख