बाळासाहेबांना मानणारे राज ठाकरे राजकीय नेते म्हणून कसे आहेत ? - raj thackeray birthday kedar shinde special post on his birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

बाळासाहेबांना मानणारे राज ठाकरे राजकीय नेते म्हणून कसे आहेत ?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

मैत्री करावी तर या राजा माणसाशी...सतत लक्ष असतं त्यांचं...सतत संपर्कात असतात..

पुणे :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray Birthday यांचा आज वाढदिवस असून त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त विशेष पोस्ट शेअर केली आहे. "कोरोनाच्या कठिण परिस्थितीमध्ये राज ठाकरे एकमेव राजकीय नेते आहेत, त्यांनी राजकीय पोळी भाजली नाही...हे आपल्याला सतत जाणवलय...मान्य करायालाच हवं," असे केदार शिंदे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. raj thackeray birthday kedar shinde special post on his birthday

दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या फेसबूकपोस्ट म्हणतात...

"राजसाहेब.....ते राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही...पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो...तो राजा माणूस आहे...तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे...संगीत चित्रपट या दोन क्षेत्रातला  त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही...मैत्री करावी तर या राजा माणसाशी...सतत लक्ष असतं त्यांचं...सतत संपर्कात असतात...वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण "#राजसाहेब_यंग_ॲन्ड_डायनॅमिक" आहेत...या कोरोनाच्या कठिण परीस्थितीमध्ये हा एकमेव राजकीय नेता होता, ज्यांनी राजकीय पोळी भाजली नाही...हे आपल्याला सतत जाणवलय...मान्य करायालाच हवं...

एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही...त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे...एकदम 70mm...आपण इतक्या लोकांना संधी दिली...काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली...एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ...नक्कीच आपल्यावर "#राज्य" येणार नाही, याची ते काळजी घेतील...आज त्यांचा वाढदिवस आहे...त्यानिमित्ताने हे गीफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ...मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करतील...

"कृष्णकुंज" फुलांनी सजले..मनसे 53 हजार पुस्तके भेट देणार..  
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज बंगल्याच्या (दादर) गेटवर मनसे कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली आहे. नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सोशल मीडियावरुन राज ठाकरेंवर वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होते आहे. तर राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख