बॉडी बिल्डर मनोज पाटीलला न्याय मिळवून देण्यासाठी पालकांचे राज ठाकरेंना साकडे

मनोज देशासाठी पदक मिळवू इच्छितोय, त्याला त्रास न देता पुढे जाऊ द्यायला हवं, असं म्हणत मराठी माणसाच्या मनसे पाठीशी उभी राहील, आणि आपल्याला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचं मनोज पाटील यांच्या आई वडिलांना आहे
मनोज पाटील.jpg
मनोज पाटील.jpg

मुंबई : बॉडी बिल्डर मनोज पाटील (Manoj Patil)  याने आपला मानसिक छळ होत असल्याच म्हणत आत्महतेचा प्रयत्न केला होता , अभिनेता साहिल खान (Saahil Khan)  यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचं मनोज यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. साहिल खान यांच्या विरोधात आता गुन्हा नोंद करण्यात आलाय. पण तरी देखील साहिल खान वर गुन्हा नोंद होऊनही कडक कारवाही होत नसल्याचं म्हणत मनसे अध्यक्ष  राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणी करण्यासाठी आज मनोज पाटील यांच्या आई वडील आणि भावाने राज गड येथे मनसे नेत्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मनसे मनोजला पूर्ण पाठिंबा देणार असल्याच मनसेने स्पष्ट केलंय. शालिनी ठाकरे (Shalini Thackeray)  यांनी देखील मनसे मनोज यांच्या पाठीशी असल्याचं म्हटल्याचं मनोज यांच्या आईने म्हटलंय .

मनोज देशासाठी पदक मिळवू इच्छितोय, त्याला त्रास न देता पुढे जाऊ द्यायला हवं, असं म्हणत मराठी माणसाच्या मनसे पाठीशी उभी राहील, आणि आपल्याला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचं मनोज पाटील यांच्या आई वडिलांना आहे. त्यामुळे आपण मनसे अध्यक्षांची भेट घेऊ इच्छित असल्याचं मनोज पाटील यांच्या आईवडिलांनी म्हटलं . 

नक्की काय आहे प्रकरण? 

मनोज पाटील यांनी साहिल खान आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप करत मुंबईतील एका पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, मनोज पाटीलने काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोजच्या सुसाईड नोटमध्ये अभिनेता साहिल खानवर गेल्या अनेक दिवसांपासून त्याला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. साहिल खानकडून आपला छळ आणि निंदा होत असल्याकारणाने तो आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणावर साहिल खान काय म्हणाला?

या प्रकरणात अभिनेता साहिल खानचे नाव थेट ओढले जात आहे, मात्र, या प्रकरणात आपले नाव मुद्दामुन गोवले जात असल्याचा आरोप साहिल खानने केला आहे. 'मी सोशल मीडियाद्वारे दिल्लीत राहणाऱ्या  राज फौजदार नावाच्या मुलाला भेटलो होतो. राजने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात त्याने मनोज पाटीलने त्याला २ लाख रुपये घेऊन एक्सपायर झालेले स्टिरॉइड्स विकले. हे कालबाह्य झालेले स्टिरॉईड घेतल्यानंतर त्याला हृदय आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत. राज यांच्याकडे आवश्यक कागदपत्रेही आहेत.

मी त्याला सोशल मीडियावर पाठिंबा दिला आणि व्हिडिओ शेअर केला. हे स्टेरॉईड रॅकेट थांबायला हवं असंही मी म्हटलं. राज फौजदार यांनी म्हटले होते की, मनोज पाटील आपले पैसे परत देत नाहीत, यामुळे राजला आपली बाईकही विकावी लागली. याबाबत राज फौजदार यांनी पोलिसांना सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. पण मला आश्चर्य वाटते की या प्रकरणात  माझे नाव कोणत्याही कारणाशिवाय राजच्या जागी ओढले जात आहे. मी फक्त राजला मदत केली. माझा मनोजशी कोणताही थेट संबंध नव्हता किंवा मी त्याच्याशी कोणताही व्यवहार केला नव्हता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com