'त्या' घटनेवरुन लक्ष हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे युतीचे विधान

एकीकडे शिवसेना-भाजप (Shivsena- BJP) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दूसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप आमदार नितेश (BJP MLA Nitesh Rane) राणे यांनी मुख्यमंत्र्यावर वेगळाच आरोप केला आहे.
nitesh rane.jpg
nitesh rane.jpg

मुंबई : औरंगाबादमधील ( Aurangabad) कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे शिवसेना-भाजप (Shivsena- BJP) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दूसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप आमदार नितेश (BJP MLA Nitesh Rane) राणे यांनी मुख्यमंत्र्यावर वेगळाच आरोप केला आहे. बीकेसी उड्डाण पुल दुर्घटनेवरुन राज्याचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.  

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्तच्या (Marathwada muktisangram Day) आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षनेतेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Union Ministor Raosaheb Danave) यांच्याकडे पाहत “मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी होतील,  असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजप युतीची चर्चा  नव्याने रंगू लागल्या आहेत.  या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वेगळाच आरोप केला आहे. 

ट्विट करत नितेश राणे यांनी आपली उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. मुंबईतील बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे एका बांधकाम सुरु असलेल्या  उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. या दुर्घटनेत10 मजूर जखमी झाले होते. या दुर्घटनेवरून प्रसारमाध्यमांसह विरोधी पक्षाचे लक्ष हटवण्यासाठी  उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना युतीची आशा दाखवणारे वक्तव्य केले का,असा  प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. आता नितेश राणे यांच्या आरोपावर शिवसेना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


बीकेसीत त्या पहाटे नक्की काय घडलं?
मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळला.  उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावरच होते. मात्र, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास अचानक हा पूल कोसळालया लागला. हा दुर्घटनेवेळी पूलावर  20 ते 25 मजूर काम करत होते.  पूलाचा एक गर्डर निखळून खाली पडला. पूल पडत असल्याचा अंदाज काही मजूरांना आल्यामुळे त्यांनी वेळीच पूलावरुन पळ काढला. मात्र त्यावेळी आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. ते सर्व मजूर थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले होते. या मुद्द्यावरु भाजप शिवसेनेला लक्ष्य साधणार हे शिवसेनेला अपेक्षित होते.  मात्र, उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांना या घटनेचा विसर पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com