भाडेकरु नव्या कायद्यांच्या विरोधात शिवसेनेचा आज एल्गार..

भाडेकरुंना थेट घराबाहेर काढण्याची मोकळीक चाळ मालकांना मिळाली असल्याचा मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-04T114144.548.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-04T114144.548.jpg

मुंबई :  भाडेकरू आणि घर मालकांचे हित जोपासणे, भाडे मालमत्तेच्या विवादांचे कोर्टावरील ओझे कमी करणे. तसेच त्वरेने तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने  नवीन भाडेकरु कायदा आणलाय. या कायद्याचा एक उद्देश भाड्याने मिळणार्‍या मालमत्तेचा व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी आहे.  या कायद्यातील अटी या जाचक असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.   शिवसेना त्याविरोधात आज निदर्शन करणार आहे.  new model tenancy act got modi government clearance know who will be benefitted

केंद्र सरकारने भाडेकरू विरोधात संमत केलेल्या कायद्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज (ता. ४) दादर येथील शिवसेना भवन येथे या कायद्याचा जाहीर निषेध करुन निदर्शनं करण्यात येणार आहे.  या वेळी खासदास राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर,  नगरसेविका श्रद्धा जाधव उपस्थित राहणार आहे.  

या कायद्यानुसार वर्षानुवर्षे उपकर प्राप्त चाळी व  इमारतींमध्ये अल्प भाड्यात राहणार्‍या भाडेकरूकडून बाजारभावाने भाडे आकारणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन महिने भाडे न भरल्यास भाडेकरुंना थेट घराबाहेर काढण्याची मोकळीक चाळ मालकांना मिळाली असल्याचा मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.  

यामुळे मुंबईत १४,५०० उपकरप्राप्त इमारती व चाळीमध्ये वास्तव्य करणारे लाखो भाडेकरू बेघर होण्याचा धोका आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.  निवासी व अनिवासी जागेसाठी बाजारभावानुसार भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. या कायद्यामुळे घर रिकामी करताना दोन महिन्यापर्यंत दुप्पट व नंतर चारपट भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. 
 
मराठा आरक्षण मोर्च्यावरुन विनायक मेटे, जिल्हाधिकारी आमने सामने.. 
बीड  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (ता. ५) बीड शहरात, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यासह मराठा समाजातील विविध संघटना मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा कोरोनाच्या संकटामुळे उद्या न काढता पुढे ढकलावा, अशी विनंती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आयोजकांकडे केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जगताप यांनी पत्रकार परिषदेत  दिली आहे. दुसरीकडे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की , मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा तर निघणारच आहे . जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांना अडवू नका, अन्यथा ज्या ठिकाणी पोलिसांनी मराठा समाज बांधवांना अडवले आहे. त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com