आतापर्यंतच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींमध्ये अमृता फडणवीसांचे दु:ख सर्वांत मोठे! - NCP spokesperson Umesh Patil criticizes Amuta Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

आतापर्यंतच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींमध्ये अमृता फडणवीसांचे दु:ख सर्वांत मोठे!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है!

मुंबई : तौते चक्रीवादळाच्या प्रार्श्वभूमिवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis)यांनी ट्वीट केले होते. त्या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तूळात चांगलीच रंगली होती. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.  (NCP spokesperson Umesh Patil criticizes Amuta Fadnavis)

हे ही वाचा : गंगेत मृतदेह ; मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

पाटील म्हणाले, ''राज्यावर चक्रीवादळाचे संकट ओढावले असताना अमृता फडणवीस संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.

उमेश पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की ''आजपर्यंत देशात जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढे दुःख झाले नसेल तेवढे दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करत असतात. कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते, असे पाटील म्हणाले.

हे ही वाचा : दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारु नका..''राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा...

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या? 

अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की ''तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है! या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तूळात चांगलीच रंगली होती. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांना राज्याच्या राजकारणात आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायचे आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. महाराष्ट्रातील राजकारणावर याचे काय परिनाम होणार का असे अनेक प्रश्न फडणवीस यांच्या या ट्वीटमुळे उपस्थित झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख