राज ठाकरे यांच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून उत्तर..

राज ठाकरे यांनी काल एका मुलाखतीत राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-13T120152.570.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-13T120152.570.jpg

मुंबई : ''राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला'', असा आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी काल एका मुलाखतीत राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्याला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक Nawab Malikयांनी उत्तर दिलं आहे. 

राज्यात सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल केला आहे. एका मुलाखतीत राज ठाकरे Raj Thackeray यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर NCP आरोप केला. त्यानंतर आज नवाब मलिक यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ''देशात वर्णव्यवस्था हजारो वर्षापासून आहे. राज ठाकरे यांनी वाचन करायला हवं,'' असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. 

''राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र, राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहे.  या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहित नसावे,'' असेही नवाब मलिक म्हणाले. 

''छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे,'' असा उपरोधिक टोला लगावतानाच 'राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे,' असे नवाब मलिक म्हणाले.  

काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, ''देशाला विचार देणारा महाराष्ट्र आता यूपी- बिहारच्या पातळीवर घसरत चालला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती- जातीचे विष पेरले जात आहे. अलीकडे जातीचा मुद्दा हा त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा बनला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला''
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com