Sarkarnama Banner - 2021-08-13T083430.617.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-13T083430.617.jpg

मोदी, ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवशाहीर पुरंदरेंचा सत्कार 

बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

पुणे :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  Babasaheb Purandare शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. आज  शुक्रवारी (ता. १३) पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील Shivsrushti सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या निमित्ताने बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम व ‘शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विरोधकांनी धमकावलं! मोदी सरकारच्या बचावासाठी आठ मंत्री उतरले मैदानात
जगदीश कदम म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे १३ ऑगस्ट २०२१ रोजी तिथीनुसार शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा नागरी सत्कार, कोविड मर्यादांचे पालन करीत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर या विशेष कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत शिवशाहीरांचे अभिष्टचिंतन करणार आहेत. सुमित्रा महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येईल. सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे या गौरव समारंभात सहभागी असतील. दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसृष्टीला भेट देणार आहेत.”

बाबासाहेबांचा शंभरीनिमित्त सत्कार करीत असताना शिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. या संकल्पाला या कार्यक्रमामुळे बळ लाभेल, असा विश्वास सुमित्राताई महाजन यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांच्या गौरवासाठी गठित करण्यात आलेल्या सत्कार समारोह समितीच्या वतीने पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहितीही कदम यांनी दिली. 

कोरोनातील सर्व नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम होत असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे, नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम @Shivsrushti Puneofficial या अधिकृत फेसबुक पेजवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे, अशी कदम यांनी नमूद केले. 

समारोह समितीत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), भारतरत्न सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, विख्यात गायक शंकर महादेवन, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, प्रमोद चौधरी, उद्योजक प्रतापराव पवार, क्रेडाई- पुणेचे अध्यक्ष अनिल फरांदे यांच्यासह अनेक नामवंतांचा असल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगितले.
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com