"सत्ता येणार..सत्ता येणार..हा भाजपचा एककलमी कार्यक्रम.." - NCP leader Nawab Malik targets BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

"सत्ता येणार..सत्ता येणार..हा भाजपचा एककलमी कार्यक्रम.."

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहे," असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई :  "भाजपचे लोक तारीख पे तारीख देत आहेत. सत्ता येणार...सत्ता येणार...ही भाजपची एकही भविष्यवाणी सत्य होत नाही, त्यामुळेच ते हताश होऊन आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत आहे," असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. NCP leader Nawab Malik targets BJP

"इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये, म्हणून भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे सांगत आहेत. परंतु तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहे," असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. अर्थकारक आणि राजकारण यात फरक आहे, अर्थतज्ज्ञांचा सल्ला न ऐकता केंद्र सरकार निर्णय घेत आहे. आपल्या मनाने सरकार निर्णय घेत आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोना याबाबत असाच निर्णय घेतला. लोककल्याणकारी योजना बंद केल्यामुळे गरीब जनता अडचणीत आली आहे. मोदी सरकार या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मलिक यांनी सांगितलं.

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली त्यामुळे जनता संतुष्ट आहे असेही नवाब मलिक म्हणाले. मात्र "सत्ता येणार... सत्ता येणार.." असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करीत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

ठाकरे बंधू एकत्र येतील का ? राज ठाकरेंनी आकाशाकडे बोट दाखवित उत्तर दिले..म्हणाले...
 मुंबई  : "ठाकरे" आडनावाला महाराष्ट्रात वलय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांची ठाकरी शैली याबाबत सर्वजण जाणून आहेत. मात्र, शिवसेनेत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील विस्तव जात नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. राज ठाकरेंनी ९ मार्च २००६ रोजी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.  तेव्हापासून मराठी माणसांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला ही हे दोन्ही बंधु पुन्हा कधी एकत्र येणार ?  या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं.  ठाकरे यांनी आकाशाकडे बोट दाखवित उत्तर दिलं ते म्हणाले, ''परमेश्वर जाणे''.. आम्ही कधी एकत्र येऊ हे आता सांगता येणार नाही, असं त्यांच्या उत्तरातून स्पष्ट झालं. त्याच्या या उत्तरामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या आशा तूर्तास तरी वाटत नाही. हे दोघे बंधू आगामी काळातही एकत्र येतील का? याचं उत्तर काळच देऊ शकतो. सध्या तरी असं काही होईल की नाही हे परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणत राज ठाकरेंनी ही शक्यता नाकारली आहे. मात्र हे दोन बंधू एकत्र येण्याची महाराष्ट्राची आशा मात्र अद्याप कायम आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख