ठाकरे बंधू एकत्र येतील का ? राज ठाकरेंनी आकाशाकडे बोट दाखवित उत्तर दिले..म्हणाले..

राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधु पुन्हा कधी एकत्र येणार ? या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं...
4Raj_20Thackeray_20_20Uddhav_20Thackeray.jpg
4Raj_20Thackeray_20_20Uddhav_20Thackeray.jpg

मुंबई  : "ठाकरे" आडनावाला महाराष्ट्रात वलय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांची ठाकरी शैली याबाबत सर्वजण जाणून आहेत. मात्र, शिवसेनेत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील विस्तव जात नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. राज ठाकरेंनी ९ मार्च २००६ रोजी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.  तेव्हापासून मराठी माणसांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला ही हे दोन्ही बंधु पुन्हा कधी एकत्र येणार ?  या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. thackeray brothers come together raj thackeray himself gave the answer

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं.  ठाकरे यांनी आकाशाकडे बोट दाखवित उत्तर दिलं ते म्हणाले, ''परमेश्वर जाणे''.. आम्ही कधी एकत्र येऊ हे आता सांगता येणार नाही, असं त्यांच्या उत्तरातून स्पष्ट झालं. त्याच्या या उत्तरामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या आशा तूर्तास तरी वाटत नाही. हे दोघे बंधू आगामी काळातही एकत्र येतील का? याचं उत्तर काळच देऊ शकतो. सध्या तरी असं काही होईल की नाही हे परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणत राज ठाकरेंनी ही शक्यता नाकारली आहे. मात्र हे दोन बंधू एकत्र येण्याची महाराष्ट्राची आशा मात्र अद्याप कायम आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.  

मनसेच्या पुढील वाटचालीबाबत ते म्हणाले की सर्व महापालिका निवडणुकींसाठी मनसेची स्वतःची भूमिका असेल. सध्या निवडणुकीचा विचार नको. सध्या जनतेची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला तरच निवडणुका घेण्याला अर्थ आहे. 

''मायबाप सरकार, मंदिरं उघडा नाही तर आमच्यावर बॉम्ब टाका..''  
 
शेगाव (बुलढाणा) : लॅाकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून सर्व मंदिरं बंद आहेत. त्यामुळे मंदिराच्या बाहेर आपलं पोट भरणारे आता अडचणीत सापडले आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. छोटा मोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आता लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहेत. अशाच एका मंदिराच्या बाहेर हळदी कुंकू विक्री करणाऱ्या आज्जीबाईंच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी ''आता मंदिर उघडत नसाल तर सरकारने आमच्यासारख्या गरिबांवर एखादा बॉम्ब गोळा टाकून आम्हाला मारा, किंवा आम्हा विष पाजा,'' अशी  प्रतिक्रिया दिली.  लोकडाऊनमुळे राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय. मात्र, मंदिरासमोर बसून विविध व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्याचे ही मोठं नुकसान झालंय.. त्यामुळे जगावं कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील शेगांवचे गजानन महाराज मंदिर सध्या लोकडाऊन मुळे बंद आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com