भक्तांनाही आता मोदी नकोसे वाटतात... - Nana Patole criticizes Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

भक्तांनाही आता मोदी नकोसे वाटतात...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या १२ सदस्यांची नियुक्ती अद्याप झाली, नसल्याने त्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

मुंबई :  राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या १२ सदस्यांची नियुक्ती अद्याप झाली, नसल्याने त्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून १२ जणांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. पण राज्यापालांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यापालांच्या भूमिकेवर टीका केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पटोले म्हणाले, राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त असल्याने संविधानिक पेच निर्माण झाला आहे. राज्यपालांनी १२ नामनियुक्त सदस्यांची नावे दिली नाहीत, त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना विधिमंडळाच्या समित्या तयार केल्या होत्या.

ते सदस्य आल्या नंतर त्या समित्या पूर्ण होणार होत्या. मात्र, राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती अजून झालेली नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्या समित्या संविधानिक आहे की असंविधानिक हे तपासावे लागेल. राज्यपालांच्या भूमिकेमुळे १२ जागा रिक्त असल्याने संविधानिक पेच निर्माण झाल्याचे पटोले यांनी सांगितले. 

महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा 
 

यावेळी पटोले म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली येतायत ते पाहता किंमती कमी करून डिझेल २५ रुपये आणि पेट्रोल ३५ रुपये लिटर विकायला हवे होते. पण, आता पेट्रोलचा दर १०० च्या वर गेला आहे. याचा अर्थ गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला जातोय आणि मूठभर उद्योगपती मित्रांना फायदे पुरवले जातायत, भाजप याच पद्धतीने काम करेल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल. असा इशारा पटोले यांनी दिला.

ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही 'मोदी चलेजावचा' नारा दिला. पण, त्याचा विरोध भाजप आणि मोदी भक्तांनी केला नाही. आता त्यांनाही वाटते मोदी सरकार देशाला बरबाद करायला लागले आहे. त्यामुळे त्यांच्याही लोकांना मोदी नको, असल्याचे पटोले म्हणाले.  

एक एमबीबीएस डॅाक्टर जेव्हा आयपीएस बनून ठसा उमटवतो तेव्हा...
 

पूजा चव्हाण प्रकरणावर म्हणाले. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संशयाची सुई मंत्री संजय राठोड यांच्याकडे जात आहे. या प्रकरणावर बोलताना पटोले म्हणाले, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील जे चित्र पुढे येईल त्यानंतर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. 

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर 

भाजपला सव्वा वर्षांनी ही आठवण येते, यातून त्यांची फेकूगिरी लक्षात येतेय, बंद दाराआड काय चर्चा झाली हे राज्यातील जनतेला माहित नाही, त्यामुळे भाजपच्या फेकुगिरीकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे पटोले यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख