अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय..दाऊद, छोटा राजननंतर आता फहिम मचमच.. - mumbai businessman gets extortion call on name of fahim machmach of dawood gang | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय..दाऊद, छोटा राजननंतर आता फहिम मचमच..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

फहिमचे नाव २००३ मध्ये सर्व प्रथम प्रसिद्धी झोतात आले.

मुंबई : अंडरवर्ल्डमध्ये डी कंपनीत दाऊद इब्राहिम, छोटा शकिलनंतर छोटा राजनचं स्थान होतं, माञ छोटा राजनने डी कंपनी सोडल्यानंतर त्याची जागा फहिम मचमचने Fahim Machamachघेतली आहे. परदेशातून आलेल्या अनेक फोनवरून 50 लाखांच्या खंडणीची मागणी घाटकोपरमधील व्यावसायिकाकडे केली जात आहे. या व्यावसायिकाला डॅान फहिम मचमच यांच्या नावावरुन धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.  
  
या प्रकरणी व्यावसायिकानं घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासासाठी हा गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे करण्यात आला आहे. डी कंपनीत दाऊद, छोटा शकिलनंतर राजनचं स्थान होतं, माञ राजनने डी कंपनी सोडल्यानंतर फहिमने त्याची जागा घेतली असल्याचे समजते. 

फहिमचे नाव २००३ मध्ये सर्व प्रथम प्रसिद्धी झोतात आले. फहिम मचमचने एका विकासकाकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदसाठी हप्ते वसूली करणारा फहिम हा प्रचंड बडबड्या होता. त्यामुळे त्याला मचमच हे टोकन नाव पडलं. फहिम मचमचवर मुंबईत शेकडो धमकीचे गुन्हे दाखल आहेत. फहिम हा डी कंपनीसाठी शार्प शूटरची भरती करतो.

सूञांनी दिलेल्या माहितीनुसार, फहिमने काही वर्षांपासून यूपी, रत्नागिरी, मध्यप्रदेश, कुर्ला, गोवंडी, साकीनाका,  पंजाब, राजस्थान या राज्यातून २०१८ मध्ये तरुणांची भरती डी कंपनीत केली होती. हे शार्प शूटर त्याने फेसबुकच्या मदतीने शोधून काढले होते. वांद्रे एका सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या हत्येचा कट उधळत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून फहिमच्या या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

"प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी... २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार मोदी.." 
 मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर  Prashant Kishor यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. "राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही," अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  Ramdas Athavale यांनी आपल्या खास शैलीत आपले मत मांडले आहे.  

Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख