"प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी..२०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार मोदी.."  - Ramdas Athavale criticism on Prashant Kishor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

 "प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी..२०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार मोदी.." 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

प्रशांत किशोर यांनी ज्या राज्यात प्रचार केला नाही, त्या राज्यांत ही भाजपला विजय मिळालेला आहे, असे आठवले म्हणाले. 

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर  Prashant Kishor यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. "राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही," अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  Ramdas Athavale यांनी आपल्या खास शैलीत आपले मत मांडले आहे.  Ramdas Athavale criticism on Prashant Kishor

प्रशांत किशोर यांच्या कोणी  लागू नका  नादी ; 
2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !
 नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी;  
मग का प्रधानमंत्री  बनणार नाहीत नरेंद्र मोदी ?
असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते, तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात  भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही, त्या राज्यांत ही भाजपला विजय मिळालेला आहे, असे आठवले म्हणाले. 

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.

देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे. ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून भूमिका बजावली होती. उद्धव ठाकरे यांनाही ते भेटले होते, पण ही भूमिका थेट नव्हती, अनौपचारिक केलेली मदत शिवसेनेला शिवसेनेला सत्तास्थापणेसाठी खूप फायदेशीर ठरली. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख