नरेंद्र मोदींचे भावूक होणे, हा ठरवून झालेला कार्यक्रम : नवाब मलिकांनी सांगितले हे कारण

आरोग्यसेवकांशी संवाद साधतानामोदी भावूक झाले होते.
emotional modi
emotional modi

मुंबई : देशातील आरोग्यसेवकांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Gets emotional) भावूक झाले. त्यावरून सोशल मिडियात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मात्र मोदी यांचे भावूक होणे म्हणजे ठरवून झालेला कार्यक्रम होता, अशी टीका केली आहे. (NCP criticizes modi`s outbroken emtotions) 

त्यासाठी त्यांनी कारणही सांगितले होते. मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बोलताना मोदीसाहेब नेहमी परचा आणि मास्क वापरत होते. त्यामुळे त्यांचा चेहरा उघड कधी दिसला नाही. मात्र त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता असा आरोप मलिक यांनी केला. याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहे. 

देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला.औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्रसरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले की ते भावूक झाले याबाबत लोकं प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 

भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय अशा शब्दांत त्यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीजी यांनी डिलीट केलेलं ट्वीट आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासातच माघारी घेतल्याची बाब समोर आली. भाजपच्या या नीतीवर नवाब मलिक यांनी प्रहार केला आहे. 

ज्याप्रमाणे गुजरातला १ हजार कोटी दिले तसेच नुकसान झालेल्या राज्यांना विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यांना आर्थिक मदत देण्याचं ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीजी यांनी केलं. पण काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. याआधी नितीन गडकरी यांनीही याप्रकारे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले गेले. ट्वीट डिलीट होतेय. नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेतायत म्हणजे अंतर्गत बोलण्याचा अधिकार नाही हे यातून सिद्ध झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com