तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मनपा सज्ज, लहान मुलांसाठी साडेसातशे खाटांची व्यवस्था..

धोका लक्षात घेता फक्त लहान मुलांसाठी म्हणून ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
Aurangabad Muncipal corporation ready to third corona weave news
Aurangabad Muncipal corporation ready to third corona weave news

औरंगाबाद ः दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या शहरात कमी होत आहे. प्रशासनाने लादलेले कठोर निर्बंध आणि लाॅकडाऊनमुळे ही संख्या घटल्याचे बोलले जाते. दुसरी लाट ओसरून रुग्णसंख्या कमी होत असली तरी तिसऱ्या कोरोना संसर्ग लाटेचा धोका कायम आहे. (Corporation ready to do two hands with the third wave, arrangement of seven hundred and fifty beds for children.)विशेष म्हणजे या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने राज्याच्या आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याच आदेश दिले होते. औरंगाबाद महापालिकेने या अंतर्गत जय्यत तयारी केली असून लहान मुलांसाठी शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये सातशेहून अधिक खाटांची व्यवस्था केली आहे. 

शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये ७३६ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून यात  ४५ व्हेंटिलेटर आणि ४३७ आॅक्सिजन सुविधा असलेल्या बेड असणार आहेत.(MGM also hired psychiatrists at the Bal Kovid Center in Meltron) एमजीएम, मेल्ट्रॉनमधील बाल कोविड केंद्रातही मनपान डाॅक्टरांची नियुक्ती केली करण्यात आल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. निता पाडळकर यांनी कळवले आहे.

गरवारे कंपनीत शंभर खाटांचे बाल कोविड रुग्णालय उभारण्याचे काम  सध्या वेगान सुरू आहे. या शिवाय एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शंभर खाटांचे बाल कोविड सेंटर तयार केले जात आहे. (242 beds have been provided in eight covid care centers in the city.) शहरातील आठ कोविड केअर सेंटरमध्ये २४२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये ६  व्हेंटिलेटर , एनआयसीयूचे २४, पीआयसीयू २० व इतर १९८ बेड असतील. तर फक्त कोविड सेंटर असलेल्या नऊ ठिकाणी  ३९४ खाटा  असणार आहेत.  यात देखील व्हेंटिलेटरचे ३९, एनआयसीयू ४९, पीआयसीयू ९४, इतर २५१ खाटांचा समावेश असेल.  राहतील.

मेल्ट्रॉनमध्ये  ५० बेडची व्यवस्था

कोरोना काळात सर्वाधिक रुग्णांवर उपचार झालेल्या मेल्ट्राॅन कोविड केअर सेंटर मध्ये तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता फक्त लहान मुलांसाठी म्हणून ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.  ऑक्सिजनची व्यवस्था असणारे ह सर्व बेड असणार आहेत. या शिवाय एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील कोविड सेंटरसाठी मनपाचे डॉक्टर व कर्मचारी राहतील.

गरवारे बाल कोविड सेंटरकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार असून बालरोग तज्ज्ञ संघटनेने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. बालकांवरील उपचारासाठी औषधी व इतर साहित्य खरेदी केले जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com