‘स्पुटनिक’च्या थेट खरेदीसाठी महापालिकेचे प्रयत्न

रशियाने तयार केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधक लशीची थेट खरेदी करण्यासाठी मुंबई पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी रशियन राजदूतांसह या लशीच्या निर्मितीत व्यावसायिक भागीदार असलेल्या रशियन कंपनीसोबत संपर्क साधला जात आहे.
Sputnik v
Sputnik v

मुंबई : रशियाने तयार केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधक लशीची थेट खरेदी करण्यासाठी मुंबई पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी रशियन राजदूतांसह या लशीच्या निर्मितीत व्यावसायिक भागीदार असलेल्या रशियन कंपनीसोबत संपर्क साधला जात आहे. 

पालिकेने कोविड लस खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. लशींच्या पुरवठ्यासाठी तीन कंपन्यांनी पालिकेला प्रतिसाद दिला आहे. मात्र, या कंपन्या लस निर्मिती करत नाहीत. त्या केवळ पुरवठादार आहेत. त्यामुळे पालिकेने अधिक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना कंपन्यांना केल्या आहेत. यासाठी मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. 

दरम्यान पालिकेने रशियन राजदुतांसह थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याशिवाय या लशीच्या निर्मितीत व्यावसायिक भागीदार असलेल्या ‘रशियन डायरेक्ट इनव्हेंस्टमेंट फंड’ या कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या कंपनीचे विशेष कार्याधिकारी क्रिमील दिमित्री यांना त्याबाबत पत्र पाठवल्याचे समजते. भारतात स्पुटनिक लशीच्या मात्रेची किंमत पाहता यासाठी ५०० कोटी रुपयांपर्यंत खर्चाची तयारी पालिकेने केली आहे. ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानामध्ये साठवता येते.
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com