पोकळ धमक्यांना घाबरत नाही ; राष्ट्रवादीनं भाजपला खडसावलं

जेलमध्ये ठेवा, सत्तेचा दुरुपयोगही करा ही काय नवीन गोष्ट नाही.
nawab Malik.jpg
nawab Malik.jpg

मुंबई : भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांवर आरोप करुन धमक्या दिल्या आहेत. याचा राष्ट्रवादी कॉग्रेसने समाचार घेतला''भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा. सत्तेचा दुरुपयोगही करा, ही काय नवीन गोष्ट नाही,'' असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी भाजपला  BJP सुनावले आहे.

''सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही,'' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे. 

‘भाजपच्या मूळ नेत्यांमध्ये आमचा सामना करण्यासाठी धमक नाही. म्हणून आता उपऱ्यांना पुढे केले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे,  Narayan Rane विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar आणि आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांच्याकडे बघितल्यावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले, असा प्रश्न पडतो,’ असा टोला युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे. 

सार्वजनिक स्वच्छतागृहावर शिवसेनेनं लावलं राणेंचं पोस्टर  
सोलापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांचातील वाद मिटण्याची चिन्हं दिसत नाही. दोन दिवसापूवी भाजप आणि शिवसेनेचे कार्यक्रते एकमेंकांना भिडल्यानंतर राडा झाला. त्याचे पडसाद राज्यात उमटले. नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करताना शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुखांनी अंत्यत खालच्या शब्दात टीका केली आहे. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले ? सरदेसाईचा सवाल 
नवी मुंबई : ‘भाजपच्या मूळ नेत्यांमध्ये आमचा सामना करण्यासाठी धमक नाही. म्हणून आता उपऱ्यांना पुढे केले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे,  Narayan Rane विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar आणि आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांच्याकडे बघितल्यावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले, असा प्रश्न पडतो,’ असा टोला युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com