रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले ?सरदेसाईंचा सवाल

शिवसेनेचे आव्हान पेलण्यास भाजप समर्थ नसल्याने आता उपऱ्यांना पुढे केले जात आहे.
3Varun_20Sardesai_20F.jpg
3Varun_20Sardesai_20F.jpg

नवी मुंबई : ‘भाजपच्या मूळ नेत्यांमध्ये आमचा सामना करण्यासाठी धमक नाही. म्हणून आता उपऱ्यांना पुढे केले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे,  Narayan Rane विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar आणि आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांच्याकडे बघितल्यावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले, असा प्रश्न पडतो,’ असा टोला युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे.  ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात ते बोलत होते. 

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळात भाजप ‘पार्टी विथ डिफरन्स’ होती. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संस्कार वर्ग चालतात. आताच्या भाजपकडे बघितल्यावर हेच का प्रबोधिनीचे संस्कार, असा प्रश्‍न पडतो, असा थेट शाब्दिक हल्ला वरुण सरदेसाई यांनी काल चढवला.  त्यांनी कॉर्पोरेट कल्चरपासून शिवसैनिकांच्या आक्रमक डीएनएपर्यंत आणि भाजपमध्ये झालेल्या उपऱ्यांच्या गर्दीबाबत रोखठोक मते मांडली.
 
सार्वजनिक स्वच्छतागृहावर शिवसेनेनं लावलं राणेंचं पोस्टर  
‘विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांच्यासारखे भाजपचे जुनेजाणते नेते आता कोठेही दिसत नाहीत. शिवसेनेचे आव्हान पेलण्यास भाजप समर्थ नसल्याने आता उपऱ्यांना पुढे केले जात आहे. 'खासदार पूनम महाजन आणि प्रीतम मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जात नाही, २०१९ मध्ये पक्षात आलेल्यांना मात्र संधी दिली जाते. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव कशामुळे झाला हे उघड सत्य आहे,’ असेही ते म्हणाले. ‘जुहूतील प्रकारानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. जनआशीर्वाद यात्रा काढण्याची जबाबदारीही बाहेरून आलेल्यांवर सोपवण्यात आली, यावरून सर्व काही स्पष्ट होते. संघ संस्कारात वाढलेल्या पुण्याच्या जुन्या कार्यकर्त्याला नारायण राणे यांची बाजू मांडावी लागते म्हणजे बघा,’ असा चिमटाही त्यांनी काढला.

 फक्त पाच चेहरे दिसतात
''जुन्या नेत्यांना उमेदवारी दिली गेली नाही. आता संघाच्या प्रचारकांना संधी मिळणार नाही. ते शिवसेनेसमोर टिकू शकत नाहीत. तसे जाहीर करून त्यांना घरी तरी बसायला सांगावे,'' असा टोलाही सरदेसाई यांनी भाजपला लगावला. भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यातील फक्त पाच चेहरे दिसतात. जास्तीत जास्त आठ नेते बोलतात. त्यात जुने चेहरे किती, असा प्रश्‍नही वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला. ज्यांच्याविरोधात तक्रारी केल्या, आंदोलने केली तेच पक्षात नेतृत्व करत आहेत. जुन्या पदाधिकाऱ्यांना त्याचा किती त्रास होत असेल याचा विचार भाजपने करावा, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com