मंचावर न बसता रस्त्यावरच बसून सुप्रिया सुळेंनी साजरा केला वर्धापन दिन.. - maharashtra ncp 22 supriya sule celebrated anniversary by sitting on the street  | Politics Marathi News - Sarkarnama

मंचावर न बसता रस्त्यावरच बसून सुप्रिया सुळेंनी साजरा केला वर्धापन दिन..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

सुप्रिया सुळे देखील रस्त्यावर येऊन कार्यकर्त्यांमध्ये बसल्या..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वर्धापन दिन आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ध्वजारोहन करत हा वर्धापन साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते हजर होते.maharashtra ncp 22 supriya sule celebrated anniversary by sitting on the street 

कोरोना महामारीच्या नियमांमुळे पक्ष कार्यालयातील सभागृहात केवळ २५ मान्यवरांना बसण्याची  अनुमती देण्यात आली. मंचावर देखील निवडक नेते बसले होते. मात्र, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर बसावे लागले होते. पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनींही मग मंचावर किंवा सभागृहात न बसता बाहेर जाऊन कार्यकर्त्यांसोबत बसण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २२ वर्ष पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पक्ष कार्यालयात नेहमीप्रमाणे वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाचे नियम असल्यामुळे यंदा मोठ्या सभागृहात किंवा मैदानावर कार्यक्रम न घेता. पक्ष कार्यालयातच छोटेखानी सोहळा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत असून सरकारने कोरोनाचे नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांचे पालन करुन वर्धापन दिन साजरू करु, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली होती. 

आघाडी सरकारच्या पुतळ्याला शेतकऱ्यांनी मारले चाबकाचे फटकारे..

शरद पवार यांना ऐकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाल्यानंतर त्या सर्वांना बसण्यासाठी कार्यालयाबाहेरील बंद असलेल्या रस्त्यावर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात या लोकांना बाहेर बसावे लागल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. तसेच त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी खुद्द सुप्रिया सुळे देखील रस्त्यावर येऊन कार्यकर्त्यांमध्ये बसल्या.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणारच  

शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कुणी काहीही म्हटले तरी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणारच. शिवाय पुढच्या निवडणुकीला देखील आम्ही सर्व आघाडी म्हणून एकत्र येऊ. कुणी कितीही वावड्या उठवल्या तरी सरकारला कोणताही धोका नसल्याचे, पवार यांनी स्पष्ट केले

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख