गुड न्यूज : रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना लवकरच मिळणार..

स्पुटनिक व्ही ही भारतातील तिसरी लस असेल.
Sarkarnama Banner - 2021-05-14T125714.665.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-14T125714.665.jpg

नवी दिल्ली   :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर थैमान घातलेले असताना एक गुड न्यूज आहे.  येत्या आठवड्यात रशियाची स्पूटनिक लस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्ही ही भारतातील तिसरी लस असेल. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर जानेवारीपासून केला जात आहे.Indians will soon get Russia Sputnik vaccine

जुलैपासून भारतात स्पूटनिक लसची निर्मिती होणार आहे. ते म्हणाले, की भारतात स्पूटनिक लशीचे डोस पोचले असून आणि येत्या आठवड्यात नागरिकांसाठी ही लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबत माहिती दिली. 

पुढील आठवड्यापासून नागरिक स्पूटनिक लस घेऊ शकतील, असे म्हटले आहे. रशियाकडून मर्यादित संख्येत आालेल्या लशींची विक्री केली पुढच्या आठवड्यात सुरू होईल. ते म्हणाले की, देशात अधिकाधिक लस उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक पातळीवर काम केले जात आहे. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत लशीची उपलब्धता पाहता एकूण २१६ कोटी डोस मिळण्याची आशा आहे. 

यात ५५ कोटी डोस कोव्हॅक्सिनचे, ७५ कोटी डोस कोव्हिशिल्डचे, ३० कोटी डोस बायो इ सब यूनिट लशीचे, ५ कोटी डोस जायडस कॅडिला डीएनचे, २० कोटी डोस नोव्हॅक्सिनचे, १० कोटी डोस डोस भारत बायोटेक नेजल लसीचे, ६ कोटी डोस जिनोवाचे आणि १५ कोटी डोस स्पुटनिकचे असतील. याशिवाय अन्य डोस देखील भारतात दाखल होणार आहे.

१ मे रोजी भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप आली होती आता या लशींची दुसरी खेप येणार आहे. भारतात रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक व्ही लशींची निर्मिती करणार आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीला केंद्रीय औषध प्रमाणन आणि नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. 

स्पुटनिक व्ही लशीचे दीड लाख डोस 1 मे 2021 रोजी भारतामध्ये आले आहेत. आता लशीची दुसरी खेप भारतात पोहोचणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com