आव्हाडांचे निंदाजनक कृत्य...भुर्दंड राज्याच्या तिजोरीवर का?...विक्रांत पाटलांचा सवाल.. - BJP leader Vikrant Patil criticizes NCP leader Jitendra Awhad | Politics Marathi News - Sarkarnama

आव्हाडांचे निंदाजनक कृत्य...भुर्दंड राज्याच्या तिजोरीवर का?...विक्रांत पाटलांचा सवाल..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 मे 2021

निंदाजनक कृत्यांसाठीचा आर्थिक भुर्दंड जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सहन केला पाहिजे.

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विरोधात सोशल मीडिया वर पोस्ट टाकली म्हणून एका युवकाला त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  या प्रकरणाचा खटला उच्च न्यायालयात सुरू आहे. राज्य सरकारने अनिल साखरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक केली आहे, यासाठी प्रतिसुनावणी त्यांना अडीच लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. या विषयावरुन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

ज्या गुंडगिरी प्रवृत्तीमुळे राज्याचं नाव बदनाम झाल, मंत्र्यांनी स्वतः चां इगो म्हणून आपली दहशत दाखविण्यासाठी जे कृत्य केलं, त्याचा भुर्दंड राज्याच्या तिजोरीवर का ? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. जनतेच्या पैशातूनच जनतेला मारहाण करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी खर्च केला जाणार हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा निंदाजनक कृत्यांसाठीचा आर्थिक भुर्दंड जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सहन केला पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. अनंत करमुसे नावाच्या एका युवकाला केलेली मारहाण केली असल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर आहे.  

Maratha Reservation : लढा अजून संपलेला नाही ! आपण तो शेवटपर्यंत लढू...संभाजीराजेंचा निर्धार...

जनेतचा पैसा नेत्यांच्या अशा वायफळ गोष्टींसाठी होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. एकीकडे कोरोना संकट काळात राज्यातील नागरिक तडफडून मरत असताना त्यांच्यावर खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे कमी पडतात, त्यावेळी केंद्रांनी मदत करावी, अशी ओरड यांचे नेते करत राहतात आणि इकडे मात्र जनतेच्या पैशाचां हवा तसा गैरवापर सुरू आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.  नेत्यांचे इगो आणि इमेज जपण्यासाठीचे वायफळ खर्च संदर्भातील निर्णय राज्य सरकारने त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख