नितेश राणे यांनी शब्द पाळला!

पालकमंत्री सांगत होते की, विमा कवच मी स्वतः देणार म्हणून, आता कुठे आहेत हे लोक?
Sarkarnama Banner - 2021-08-14T143124.303.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-14T143124.303.jpg

कणकवली : भाजप आमदार नितेश राणे  Nitesh Rane यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी या आपल्या मतदारसंघातील १६९ सरपंचांना आरोग्य विमा स्वखर्चाने काढून दिला. त्या विमा पॉलिसीचे वितरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात फडणवीस Devendra Fadnavis हे ऑनलाइन सहभागी झाले होते.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संपूर्ण कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणार्‍या सरपंचांना विम्याचे कवच मिळावे, हा प्रयत्न नितेश राणे यांनी करून पाहिला. सरकारी यंत्रणेतून ते होत नाही, हे पाहून त्यांनी स्वत: हा उपक्रम हाती घेतला आणि सरपंचांना विम्याचे कवच प्रदान केले. नितेश राणे यांनी शब्द पाळला. 

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना कालखंडात आदेश दिला आणि ‘सेवा ही संघटन’ हे ब्रिद हाती घेत मोठे काम भाजपाने केले. कोकणावर तर याच काळात आणखी तीन संकटे आली. प्रत्येक संकटात भाजपा कार्यकर्ते समाजाच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. आज संपूर्ण राज्यातून कोकणात मदत पोहोचते आहे. नितेश राणे यांच्या या कामाचे अनुकरण राज्यातील इतर मतदारसंघात होईल आणि त्याचा फायदा सर्वच सरपंचांना मिळेल'' असे फडणवीस म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, ''कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची मदत नसतांना गावाच्या सुरक्षेसाठी सरपंच लढत आहेत. त्या सरपंचांना विमा कवच देत असतांना मला समाधान वाटते. सरपंचांनी वारंवार विनंती केली ; मात्र राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. सरपंच असलेल्या आमच्या महिला भगिनीचे अशाच पद्धतीने जनसेवा करताना कोरोना विरुद्धच्या लढ्यात निधन झाले. पालकमंत्री सांगत होते की, विमा कवच मी स्वतः देणार म्हणून, आता कुठे आहेत हे लोक? असा सवालही त्यांनी केला.

राज्यपालांची भूमिका राजकीय ; त्यांनी प्यादं बनू नये  
मुंबई : बारा आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यात राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल यांनी बारा आमदारांबाबत घेतलेला भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. राऊत हे माध्यमांशी बोलत होते. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com