मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक.. 

प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली असल्याचे सूञांनी सांगितले.
1PradeepSharma_190719_F_0_0.jpg
1PradeepSharma_190719_F_0_0.jpg

मुंबई :  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा  NIA नेअटक केली आहे.  प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली असल्याचे सूञांनी सांगितले. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी राष्ट्रीय तपास यंत्रणा  NIA ने आज सकाळी छापा टाकला होता. Encounter specialist Pradeep Sharma arrested

यावेळी काही महत्वाचे पुरावे एनआयएच्या हाती लागले होते. प्रदीप शर्माला ईडीच्या स्पेशल कोर्टात हजर केले जाणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी शर्मा यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तवेरा गाडीत मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय NIA ला आहे.  या गाडीत संतोष शेलार आणि आनंद जाधव होते.

मनसुख हिरेन प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या अंधेरी येथील घरी एआयएने छापा मारला होता. त्यांची चार तास चैाकशी करुन त्यांना ताब्यात घेतले होते. निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा यांची यापूर्वीही सलग दोन दिवस याप्रकरणी चैाकशी झाली आहे. त्यावेळी शर्मा यांच्या मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला होता. 

या प्रकरणात नुकतीच NIA नं संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जातं, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही NIA नं चौकशीला बोलावलं होतं. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाझे यांची अंधेरीत बैठक झाल्याचं बोललं जातं, त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. शर्मा यांनी ३९२ गुंडांचा एन्कांऊटर केला आहे. 

नवी दिल्ली :  उत्तरप्रदेशामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच उत्तरप्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मायावती यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाची परिस्थिती इतकी खराब झाली आहे की त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घ्यावे लागत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये टिकून राहण्यासाठी अखिलेश यादव दुसऱ्या पक्षातील प्रभावहीन झालेले माजी आमदार, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत. त्यांना पक्षात घेण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करीत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com