तुमच्या नेत्यांवर भरोसा नाय काय ? मायावतींचा अखिलेश यादवांना सवाल..

मायावती यांनी अखिलेश यादव यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
Sarkarnaa Banner (34).jpg
Sarkarnaa Banner (34).jpg

नवी दिल्ली :  उत्तरप्रदेशामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच उत्तरप्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. mayawati attacks on akhilesh yadav said samajwadi party condition is very bad

मायावती यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाची परिस्थिती इतकी खराब झाली आहे की त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घ्यावे लागत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये टिकून राहण्यासाठी अखिलेश यादव दुसऱ्या पक्षातील प्रभावहीन झालेले माजी आमदार, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत. त्यांना पक्षात घेण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. 

मायावती यांनी याबाबत टि्वट करीत म्हटलं आहे की, अखिलेश यादव, तुम्हाला तुमच्या स्थानिक नेत्यांवर भरोसा राहिला नाही का..अन्य पक्षातील  नेत्यांना समाजवादी पक्षात घेण्यासाठी चाचपणी सुरु आहे. 

यापूर्वीही मायावती यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली होती. जातीय राजकारणाचा आरोप मायावती यांनी समाजवादी पक्षावर केला होता. बहुजन समाज पक्षात खिंडार पडल्याच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की समाजवादी पक्षाचा चाल, चरित्र आणि चेहरा हा नेहमी दलितांच्या विरोधातच असल्याचे जगजाहीर आहे. बसपामधून निंलबित केलेल्या आमदारांच्या माध्यमातून ते माध्यमांतून नेहमी प्रचार करीत आहेत. 
तुमचा उद्धव..आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे.. 
मुंबई :  श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते. काल भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.  या घटनेवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. कालच्या राड्यावर नितेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे.. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com