BJP खासदाराच्या घरीच लसीकरण..कार्यकर्ते, समर्थकांसाठी व्हीआयपी व्यवस्था...

घरी सुरु असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
arkarnama Banner - 2021-05-15T111030.140.jpg
arkarnama Banner - 2021-05-15T111030.140.jpg

उज्जैन: देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे, लशींचा तुटवडा भासत आहे, अशा परिस्थितीत मात्र, काही लोकप्रतिनिधी आपले समर्थक, कार्यकर्त्यांना व्हीआयपी व्यवस्था करून कोरोना लशींकरण करत आहे, तर दुसरीकडे सामान्य जनता उन्हात तासन् तास रांगेत उभी आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या खासदाराने आपल्या समर्थक, कार्यकर्त्यांसाठी आपल्या घरी लसीकरण मोहीम राबविली आहे. यावर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी टीका केली आहे. corona vaccination ujjain mp anil firojiya left public left standing to get their staff vaccinated

भाजप खासदार अनिल फिरोजिया (उज्जैन, मध्यप्रदेश) यांच्या घरी सुरु असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांचे लसीकरण होत असल्याचे दिसत आहे.  या लसीकरणावर कॅाग्रेसचे आमदार महेश परमार यांनी टीका केली आहे. 

ऑक्सीजन न मिळाल्यामुळे काही दिवसापूर्वी भाजपचे पदाधिकारी जिंतेद्र शीरे यांचा मृत्यू झाला, या घटनेनंतर खासदार अनिल फिरोजिया हे किती खोटे बोलतात, याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात शीरे याच्या नातेवाईकांनी फिरोजिया यांच्यावर आरोप केले होते.  

पुणे  :  महाराष्ट्रातील कोरोना, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याबाबत हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींशी मुख्यमंत्री चर्चा करु शकतात. याशिवाय राज्यातील कोरोना परिस्थिती याबाबातही चर्चेची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक उच्च न्यायालयात का आले ?  मुख्यमंत्री उच्च न्यायालयात का दाखल झाले याचं कारणं अद्याप गुलदस्त्यात आहे.  याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यक्रते डॅा. विश्वंभर चैाधरी यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली ही बातमी आयुष्यात पहिल्यांदाच वाचली. त्यातून औचित्यभंग होतो किंवा कसं याबद्दल मला निश्चित माहिती नाही.  राज्यघटनेप्रमाणे न्याययंत्रणा स्वतंत्र असणं गरजेचं आहे. बहुतेक वेळा सरकार चुकतं तेव्हाच नागरिक न्यायालयात जातात. तेव्हा सरकार न्यायालयात प्रतिवादी असतं. कदाचित त्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्या खाजगी भेटींचा किंवा सदिच्छा भेटींची प्रथा नाही. न भेटण्याचा संकेत आहे असा अनुभव आहे, असे चैाधरी यांनी म्हटलं आहे.
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com