''मुख्यमंत्री न्यायाधीशांना भेटले..'' ही बातमी पहिल्यांदाच वाचली..असं विश्वंभर चैाधरी का म्हणाले.. - Chief Minister Uddhav Thackeray met the Chief Justice | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

''मुख्यमंत्री न्यायाधीशांना भेटले..'' ही बातमी पहिल्यांदाच वाचली..असं विश्वंभर चैाधरी का म्हणाले..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक उच्च न्यायालयात का आले ?  

पुणे  : महाराष्ट्रातील कोरोना, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याबाबत हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींशी मुख्यमंत्री चर्चा करु शकतात. याशिवाय राज्यातील कोरोना परिस्थिती याबाबातही चर्चेची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक उच्च न्यायालयात का आले ?  मुख्यमंत्री उच्च न्यायालयात का दाखल झाले याचं कारणं अद्याप गुलदस्त्यात आहे. 
Chief Minister Uddhav Thackeray met the Chief Justice

याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यक्रते डॅा. विश्वंभर चैाधरी यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायाधिशांची भेट घेतली ही बातमी आयुष्यात पहिल्यांदाच वाचली. त्यातून औचित्यभंग होतो किंवा कसं याबद्दल मला निश्चित माहिती नाही.  राज्यघटनेप्रमाणे न्याययंत्रणा स्वतंत्र असणं गरजेचं आहे. बहुतेक वेळा सरकार चुकतं तेव्हाच नागरिक न्यायालयात जातात. तेव्हा सरकार न्यायालयात प्रतिवादी असतं. कदाचित त्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्या खाजगी भेटींचा किंवा सदिच्छा भेटींची प्रथा नाही. न भेटण्याचा संकेत आहे असा अनुभव आहे, असे चैाधरी यांनी म्हटलं आहे.

दिलासादायक बातमी :  अनाथ मुले, ज्येष्ठांची जबाबदारी राज्य सरकार उचलणार 

न्याययंत्रणा सर्वोच्च नाही. राज्यघटनेप्रमाणे कार्यकारी मंडळासारखीच एक शाखा आहे. विधानसभा सार्वभौम आहे तशी न्यायव्यवस्था सार्वभौम नाही. विधानसभेला कायदे करण्यापासून ती रोखू शकत नाही, फक्त घटनेला विसंगत कायदे रद्द करू शकते. नवा कायदा करा असंही सांगू शकत नाही. त्याअर्थानं मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान या पदांच्या वरचा दर्जा मुख्य न्यायमूर्तींना नाही. तेव्हा यात दोन्ही बाजूंनी औचित्याचा भंग झाला आहे का यावर चर्चा होणं आवश्यक आहे. (या आधीही अशा भेटी झाल्या असतील तर तोही औचित्यभंग समजावा का?), असे चैाधरी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल अचानक महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी यांच्यासोबत उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहलही उपस्थित होते. उद्धव ठाकरे सकाळी 11.30 च्या सुमारास हायकोर्टात दाखल झाले. प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांची किंवा कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री हे प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात. तब्बल अर्ध्या तासापासून मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू होती. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख