पराभूत उमेदवारांना जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

पक्ष संघटना मजबूत करून आपल्या पक्षाचे अधिकाअधिक उमेदवार निवडून आणायचे आहेत.
4nana_4.jpg
4nana_4.jpg

मुंबई : महापालिकांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग येताच काँग्रेसनेही तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक मुंबईत पक्ष कार्यालयात झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्षाचे कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, आमदार उपस्थितीत होते.
 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना एकत्र आणून, त्यांच्याशी संवाद ठेवत काँग्रेस पक्षसंघटनेत काल पुन्हा 'बळ' भरले आहे. महापालिकांच्या आगामी निवडणुकांत वर्चस्व वाढविण्याच्या उद्देशाने या उमेदवारांना जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे. राज्यात काँग्रेसला अजूनही मोठा जनाधार असून, त्याच्या बळावरच पक्ष पहिल्या क्रमांकावर नेण्याचे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत केले. 

एक सदस्यीय प्रभाग : सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार 
पटोले म्हणाले, “पक्ष संघटना मजबूत करून आपल्या पक्षाचे अधिकाअधिक उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी बूथ कमिट्या नेमून त्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी, व्यापारी, बेरोजगारांसाठी काँग्रेस पक्ष हाच आधार आहे. अशा घटकांच्या मागण्यांवर सतत आक्रमक राहण्याची तयारी ठेवा."

मुंबई : ''शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा धनुर्विद्येसाठी तरी आपण आर्चरी क्लबला सरावाकरता जागा  मिळवून द्यावी. अन्यथा आपले पक्षचिन्ह विसर्जीत करत जमिन हडपणारा 'पंजा' किंवा संधीसाधू 'घड्याळ' तरी करा," असा टोमणा  मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना लगावला आहे.  संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. 

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com