एक सदस्यीय प्रभाग : सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार 

बहू पॅनलसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा आग्रह असल्याची चर्चा आहे.
32thane_municipal_corporation.jpg
32thane_municipal_corporation.jpg

ठाणे : राज्यातील सर्व महापालिकांना एक सदस्यीय प्रभाग पद्धती जाहीर करण्यात आली आहे.  आता एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाल्यास मतांचे गणित पुरते कोलमडणार असल्याची धास्ती सत्ताधाऱ्यांना आहे. एकतर एक सदस्यीय पद्धतीनुसार निवडणूक झाल्यास वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे. 

आता एक सदस्य निवडणूक झाल्यास एकगठ्ठा मते मिळणे अवघड होणार असल्याने डोकेदुखी टाळण्यासाठी बहू पॅनलसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा आग्रह असल्याची चर्चा आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या मुंबई, ठाण्यासह १० प्रमुख महापालिकांची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला Shiv Sena ठाण्यात बसण्याची शक्यता आहे. तर पुण्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. 

ठाणे Thane महापालिकेची २०१३ मध्ये दोन सदस्य पॅनलने निवडणूक झाली होती. त्यानंतर कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांची निवडणूक २०१५ साली एक सदस्यीय पद्धतीने झाली होती. तर २०१७ साली झालेल्या ठाणे, उल्हासनगर, भिवंडी महापालिकांची निवडणूक चार सदस्य पॅनल पद्धतीने झाली. चार प्रभागांचा एक पॅनल अशी रचना असल्याने प्रत्येक पॅनलमध्ये एका मतदाराने चार उमेदवारांना मतदान केले. आपल्या प्रभागातील उमेदवाराच्या चिन्ह डोक्यात ठेवून अनेक ठिकाणी मतदारांनी इतर पॅनलमधील इतर तीन उमेदवारांनाही भरभरून मतदान केले. त्याचा सर्वाधिक लाभ सत्ताधारी शिवसेनेला झाला. २०१४ ला शिवसेना-भाजप युती तुटली होती. एकीकडे राज्यात भाजपचे सरकार तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असे आव्हान असतानाही पॅनल पद्धतीमुळे २०१७ साली शिवसेनेला विजयाचे शिखर गाठता आले. 

२०१७ मध्ये भाजपची जोरदार लाट असतानाही चार सदस्यीय पॅनल पद्धतीने झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेने सर्वाधिक १२ पॅनलवर एकहाती विजय मिळवत ठाणे महापालिकेवर संपूर्ण बहुमताने सत्ता मिळवली होती. चार प्रभागांच्या मतदारांचे मत एका उमेदवाराला मिळाल्याने ही किमया साधता आली. पण आता एक सदस्य निवडणूक झाल्यास एकगठ्ठा मते मिळणे अवघड होणार असल्याने डोकेदुखी टाळण्यासाठी बहू पॅनलसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा आग्रह असल्याची चर्चा आहे.

पॅनल पद्धतीने झालेल्या त्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी शिवसेना-भाजप आमनेसामने होती. त्यातही अत्यंत कमी फरकाने शिवसेना किंवा भाजपचे उमेवार निवडून आल्याचे दिसले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे, एमआयएम असा सामना पाहायला मिळाला. काँग्रेस मात्र फार कमी ठिकाणी दुसऱ्या क्रमांवर दिसून आली.

पॅनल पद्धतीमुळे अपक्ष उमेदवारांचा खूपच हिरमोड झाला. १३१ नगरसेवकांपैकी केवळ दोनच अपक्ष उमेदवार निवडून आले.  त्यामुळे साहजिकच नगसेवकांची संख्या १३१ पेक्षा जास्त होणार आहे. दुसरा धोका म्हणजे महाविकास आघाडी झाली तर तिकीट वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यात मनसे व भाजपची युती झाली तर एक गठ्ठा मराठी मते वळण्याची भीती असून गेल्या निवडणुकीत खाते न उघडू शकणाऱ्या मनसेच्या ते पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com