अधिवेशनातील त्या कामगिरीबद्दल मुंबई भाजपकडून फडणवीसांचे अभिनंदन 

भारतीय जनता पक्षाने अगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.
 Devendra Fadnavis, jpg
Devendra Fadnavis, jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाने अगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तयारी संदर्भात भाजपच्या कार्यकारिणीची गुरवारी (ता. 1 एप्रिल) ला आॅनलाइन बैठक झाली. त्यामध्ये राज्य सरकारचा भ्रष्टाचार व निवडणुकी संदर्भात चर्चा झाली.    

या बैठकीमध्ये राज्य सरकारचा भ्रष्टाचार व अपयश विधानासभेत उघडकीस आणल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. आमदार व मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस विभागातील बदली व नियुक्ती रॅकेटचा पर्दाफाश केला. राज्य सरकारचा भ्रष्टाचार व अपयश उघडकीस आणले हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.

मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी मुंबई महापालिका निवडणुका लढवण्याबद्दलचा प्रस्ताव सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने मंजूर झाल्याबदद्ल त्यांचे आभार मानले.  फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेत खऱ्या अर्थाने भगवा फडकवला जाईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

यावेळी बैठकीमध्ये आमदार अमित साटम, आशिष शेलार, मनिषा चौधरी, योगेश सागर, पराग अलवाणी, सुनील राणे यांच्यासह सर्व आमदार, नगरसेवक व जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

हे ही वाचा...

पवार-शहा भेट राज्याच्या हिताची; पण शिवसेनेसाठी पोषक नाही

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली की नाही, हे मला माहीत नाही. पण, त्या दोघांची भेट झाली असेल तर राज्याच्या हिताची आहे. पण, ती शिवसेनेसाठी पोषक नाही, अशा सूचक शब्दांत भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी पवार-शहा भेटीवर भाष्य केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अहमाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त मधल्या काळात आले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. त्या भेटीबाबत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सर्व गोष्टी ह्या सार्वजनिक करायच्या नसतात, असे संदिग्ध उत्तर देत शहा यांनी आणखी गोंधळ वाढवला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com