राज्यात सर्वाधिक ४३ हजार १८३ रूग्ण : दिवसभरात २४९ रूग्णांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात चोवीस तासात ८ हजार ११ रुग्ण; जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार जणांचा मृत्यू
corona.jpg
corona.jpg

पुणे : राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून आज दिवसभरात ४३ हजार १८३ रूग्णांची नोंद झाली तर दिवसभरात २४९ रूग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थितीदेखील बिकट असून पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूंच्या संख्येने गुरुवारी (ता.१) दहा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार ३९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील पाच हजार ५०६ जण आहेत. जिल्ह्यात आज ८ हजार ११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण नव्या रुग्णांत शहरातील ४ हजार १०३ जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार ८३८ झाली आहे. यापैकी १५ हजार ५०५ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार चालू आहेत.

पुणे जिल्ह्यात चोवीस तासात ८ हजार ११ रुग्ण; जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार जणांचा मृत्यू
दिवसभरात तब्बल ६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूंमध्ये शहरातील ३५ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १०, नगरपालिका हद्दीतील आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंमध्ये जिल्ह्याबाहेरील ४५८ मृत्यूंचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात ५ हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आजच्या एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार ७७ , पिंपरी चिंचवडमधील १ हजार १६१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ३५१, नगरपालिका हद्दीतील ३९५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३३ रुग्ण आहेत.

आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ११३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार २७२, नगरपालिका क्षेत्रात ३९१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३२ नवे रुग्ण सापडले आहेत. सद्यःस्थितीतील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४९ हजार ३३३ जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक ५ हजार ४३९, पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ३६०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४ हजार २०, नगरपालिका हद्दीतील २ हजार ३०६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३८० रुग्ण आहेत.

आज सर्वाधिक चाचण्या
जिल्ह्यात आज सर्वाधिक २९ हजार ६४६ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरातील २० हजार ६८१ चाचण्यांचा समावेश आहे. शहरातील चाचण्यांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. याआधी दिवसांत कमाल १६ हजार चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

लॉकडाऊन परवडणारा नाही : आमदार लांडगे
पिंपरी चिंचवडमधील भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे यांनी लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यास विरोध केला आहे.तो टाळण्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

लोकांची नियम पाळण्याविषयीची उदासीनता, बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरी आरोग्य यंत्रणा या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात परत एकदा कडक लॉकडाऊन करण्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधून आता कुठे सावरु लागलो नाही तोच सरकारने तो पुन्हा लागू केला,तर गेल्या वर्षासारखी भयावह परिस्थिती पुन्हा दिसेल,अशी प्रतिक्रिया यावर महेशदादांनी फेसबुक लाईव्ह व्दारे दिली. जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले, लॉकडाऊन टाळणे हे आपल्याच हातात आहे. नागरिक निष्काळजीपणे स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव, करोना प्रतिबंधक विषयक नियमांचे पालन न करून धोक्यात घालत आहेत. यामुळे करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, त्यामुळे प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com