CM Uddhav Thakrey slam oppositin leaders over corona
CM Uddhav Thakrey slam oppositin leaders over corona

बिहारशी तुलना करून महाराष्ट्राची बदनामी; मुख्यमंत्री विरोधकांवर भडकले

कोरोनाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धवठाकरे विधासनभेत आज विरोधकांवर चांगलेच भडकले.

मुंबई : आर्थिक पाहणी अहवालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधासनभेत आज विरोधकांवर चांगलेच भडकले. अहवाल तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी कोरोनावर अहवाल तयार केला आहे. ही थट्टा असल्याचे सांगत मुख्यमंत्री यांनी बिहारशी तुलना करून काढण्यात आलेल्या निष्कर्षाच्या आधारे विरोधकांकडून महाराष्ट्राला बदनाम केले जात असल्याची टीका केली. 

कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. बिहारचा कोविडमधला फोलपणा समोर आला आहे. तिथे होणाऱ्या चाचण्या तसेच इतर बाबींचे सत्य समोर आले आहे. हे निकष धरून महाराष्ट्राला बदनाम करत आहात. महाराष्ट्रातील यंत्रणेवर विश्वास न ठेवता महाराष्ट्राला बदनाम करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. 

दाराआडही कधी खोटे बोलणार नाही

कोरोना काळात आम्ही एकही रुग्ण किंवा मृत्यू लपवला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. आम्ही कधीही खोटी माहिती दिली नाही. खोटेपणा करणे आमच्या रक्तात नाही. बंद दाराआडही कधी बोलणार नाही. पाठ थोपटून घ्यायला, काम करणारी छाती असावी लागते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

पीएम केअर फंडची पोलखोल करा

महाराष्ट्रातील जनतेसाठी सोयीसुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरू केले. विरोधकांचा फंड महाराष्ट्राकडे न येता दिल्लीकडे गेला, असे मुख्यमंत्री म्हणतातच भाजपच्या काही आमदारांनी आक्षेप घेतला. आम्ही निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फंडची पोलखोल करताना पंतप्रधान फंडचा हिशेब कोण देणार. पण ते महनीय व्यक्ती आहेत. त्यांचा फंड विचारण्याची कोणामध्ये हिंमत नाही. प्रश्न विचारला की देशद्रोह. ही इथली लोकशाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com