केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवा आदेश.. "हे काम स्वेच्छेने करायचे आहे..." - Central Government Employees will also give medical advice to Corona patients  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवा आदेश.. "हे काम स्वेच्छेने करायचे आहे..."

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

एका नव्या आदेशाने आता केंद्रीय कर्मचारीही कोरोना योद्धे बनू शकणार आहेत.

नवी दिल्ली  : कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आदींची संख्याही कमी पडू लागल्याचे अनेक राज्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी व्यावसायिक डॉक्टरांनाही कोरोना लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. एका नव्या आदेशाने आता केंद्रीय कर्मचारीही कोरोना योद्धे बनू शकणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत प्रकोप कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) हा नवा आदेश जारी केला आहे.Central Government Employees will also give medical advice to Corona patients

देशभरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. वैद्यकीय मनुष्यबळाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही हा आदेश काढला. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दूरध्वनीद्वारे उपचार करण्यासंदर्भात कोरोना निर्मूलनाच्या कामातील ही मदत स्वेच्छेने आणि धर्मादाय स्वरूपात करावयाची आहे. त्यासाठी त्यांना कोणाच्याही परवानगीची गरज असणार नाही. त्याचप्रमाणे रुग्णांना सल्ला देणे किंवा अन्य मदत करणे आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त म्हणजेच ते काम संपल्यानंतर करावयाचे आहे, असेही बजावले आहे. जे कर्मचारी सरकारी सेवेत असतील, मात्र ज्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची मान्यता असेल, अशा कर्मचाऱ्यांनाच ही परवानगी देण्यात येणार आहे.

शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, सोनिया गांधींसह बारा पक्ष प्रमुखांचे मोदींना पत्र.. 'सेंट्रल व्हिस्टा' थांबवा.. 
 
केंद्र सरकारच्या ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे वैद्यकीय मान्यता असेल त्यांना कोरोनाग्रस्त रुग्णांना दूरध्वनीद्वारे वैद्यकीय सल्ला देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. अर्थात कर्मचाऱ्यांनी आपल्या नेहमीच्या कामावर परिणाम होऊ न देता हे काम स्वेच्छेने करायचे आहे, असेही अधोरेखित करण्यात आले. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ५७ वर्षांपूर्वीच्या एका आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे. 

विभागप्रमुखांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही..
राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस त्या त्या क्षेत्रातील ज्ञान आणि माहिती असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उपयोग करून घेण्याबाबतचीही परवानगी केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने १९६४ मध्ये काढलेल्या अशाच प्रकारच्या आदेशाचा आधार नवीन नियमासाठी घेण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय मान्यता असेल त्यांना रुग्णावर उपचार करण्यापूर्वी प्रत्येकवेळी वरिष्ठांची किंवा विभागप्रमुखांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख