शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, सोनिया गांधींसह बारा पक्ष प्रमुखांचे मोदींना पत्र..'सेंट्रल व्हिस्टा' थांबवा.. - opposition party leaders writes letter to pm narendra modi on covid 19 pandemic | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, सोनिया गांधींसह बारा पक्ष प्रमुखांचे मोदींना पत्र..'सेंट्रल व्हिस्टा' थांबवा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम तातडीने थांबविण्यात यावे आणि हे पैसे कोरोनाविरोधातील लढाईसाठी वापरा.

नवी दिल्ली  : दिल्लीमध्ये बांधला जाणारा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, देशभरातल्या नागरिकांसाठीचं मोफत लसीकरण, ३ कृषी कायदे अशा एकूण ९ मुद्द्यांबाबत देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना narendra modi संयुक्तपणे पत्र लिहिलं आहे. या नेत्यांमध्ये अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. opposition party leaders writes letter to pm narendra modi on covid 19 pandemic

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारSharad Pawar, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे Uddhav Thackeray,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी Mamata Banerjee, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhiआदींनी हे पत्र लिहिले आहे. मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम तातडीने थांबविण्यात यावे आणि हे पैसे कोरोनाविरोधातील लढाईसाठी वापरावेत.’’ अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 
 
मोदींच्या 'इमेज बिल्डिंग' वर भडकले अनुपम खेर..म्हणाले...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागत आहे, यामुळे गरजू लोकांना तातडीने मोफत अन्नधान्य देण्यात यावे तसेच बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपयांचा भत्ता दिला जावा, अशी मागणी देखील या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. केंद्राने तातडीने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, यामुळे लाखो अन्नदाता शेतकरी कोरोनाच्या संसर्गाला बळी पडण्यापासून वाचतील, असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
या पत्रावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी.देवेगौडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच स्वाक्षऱ्या करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे (शिवसेना), ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), एम.के.स्टॅलिन (द्रमुक) आणि हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा) यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, सपचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, भाकपचे डी. राजा, माकपचे सीताराम येचुरी यांच्या नावांचाही या पत्रावर उल्लेख आहे.

“आम्ही अनेकदा स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे देखील देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्या सरकारने आमच्या सर्व शिफारशी एक तर दुर्लक्षित केल्या किंवा फेटाळल्या. त्यामुळेच देशातल्या परिस्थितीने गंभीर रूप धारण केलं आहे”, असं या पत्रामध्ये नमूद केलं आहे.  
 Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख