भाजप महिला आमदारांची राज्यपाल कोश्यारींकडे धाव

आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.
23koshiyari.jpg
23koshiyari.jpg

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार प्रकरणी सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रीय महिला आयोगाने महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. तर भाजपने राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी आहे, यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजपच्या महिला आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  Bhagat Singh Koshyari यांची भेट घेतली. 

भाजप आमदार मनीषा चौधरी Manisha Chaudhary, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.  शक्ती कायदा आणि महिलांवर झालेले अत्याचार दूर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी या तीनही आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे. 

साकीनाका येथे घडलेल्या एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभारात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर ‘शक्ती कायदा’ लागू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 

महिलांवर आणि लहान मुलांवर अत्याचारांच्या तक्रारींवर जलद कारवाई करता यावी आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी म्हणून महाराष्ट्र सरकार दोन कायदे करणार आहेत.
आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर ‘शक्ती’ नावाचं हे दोन कायदे असतील. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेलं हे विधेयक हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात आलं आहे. या कायद्यात प्रमुख्याने सोशल मीडियावरील गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोपींच्या कठोर शिक्षेच्या तरतुदी देखील आहेत.

शिवसेनेच्या आमदाराविरोधात जिल्हाप्रमुखांची वरिष्ठांकडे तक्रार 
 जळगाव : पारोळा येथील शिवसेना आमदार चिमणराव पाटील Chimanrao Patil यांनी केलेले रास्ता रोको आंदोलन आता पक्षांतर्गत वादात आले आहे. या आंदोलनाबाबत पदाधिकाऱ्यांना कोणतीही  माहिती दिली नसल्याची तक्रार जिल्हा प्रमुख हर्षल माने Hershal Mane यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com