मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का ? सावंतांचा सवाल

कॉग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे
1Copy_20of_20Sarkarnama_20Banner_20_2811_29_1.jpg
1Copy_20of_20Sarkarnama_20Banner_20_2811_29_1.jpg

मुंबई : ‘मंदिर हम खुलवायेंगे, धर्मको न्याय दिलायेंगे’ अशी हाक देत भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडीने आजच्या गोकुळाष्टमीच्या (gokulashtami) पार्श्‍वभूमीवर राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिली आहे. मंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्येही आध्यात्मिक आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून राज्यातील सर्वच प्रमुख मंदिरे बंद आहेत. त्याविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे आज रामकुंडावर शंखनाद आंदोलन सुरु केलं आहे. कॉग्रेसचे नेते सचिन सावंत Sachin Sawantयांनी याबाबत भाजपवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

सचिन सावंत म्हणाले की, शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही. भाजप सरकारने कावड यात्रेवर बंदी का घातली? 

केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत ,हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का ? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे. रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलीसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये, असे सचिन सावंत म्हणाले. 
 
मंदीरे खुली करण्यासाठी आज राज्यभर भाजपकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. नाशिक, पंढरपूर, पुणे येथे भाजपचे कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत. पंढरपूर Pandharpur येथे भाजप BJP कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

विठ्ठल मंदिरासह राज्यभरातील देवस्थाने सुरू करावीत या मागणीसाठी आज भाजपाने आंदोलन सुरू केले आहे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे नेतृत्वाखाली पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर हे आंदोलन सुरू आहे.  अशा वेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले आहे. बराच वेळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटीत देखील सुरू होती. पुण्यात कसबा गणपती मंदीरासमोर आंदोलन सुरु आहे. तर नाशिक येथे पंचवटी येथे रामकुंडाजवळ भाजप कार्यक्रर्ते शंखनाद करीत आंदोलन करीत आहेत.  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com