शंभुराज देसाई म्हणाले, ''राष्ट्रवादीकडून विचारणा झाल्यास विचार करु'' 

बैठकीत शिवसेनेची काय भुमिका घ्यायची, कोणते उमेदवार ठरवायचे, किती जागा लढवायच्या हे निश्चित केले जाईल,
शंभुराज देसाई म्हणाले, ''राष्ट्रवादीकडून विचारणा झाल्यास विचार करु'' 
Sarkarnama (35).jpg

कऱ्हाड :  '' राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून जर विचारणा झाली तर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करुन आमच्या जागा आम्ही ठरवून त्यांच्या पक्षाच्या जागा ते ठरवतील,'' असे मत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई  व्यक्त केले.  ''सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत आमची शिवसेनेची बैठक होणार आहे. आमदार महेश शिंदे व पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक होईल. बैठकीत शिवसेनेची काय भुमिका घ्यायची, कोणते उमेदवार ठरवायचे, किती जागा लढवायच्या हे निश्चित केले जाईल,'' असे देसाई म्हणाले.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात कऱ्हाडमधील कार्यक्रमानंतर जिल्हा बॅंकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले की, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेची बैठक होणार आहे. आमदार महेश शिंदे व पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये शिवसेनेची काय भुमिका घ्यायची, कोणते उमेदवार ठरवायचे, किती जागा लढवायच्या हे निश्चित केले जाईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामाध्यमातून जिल्हा बॅकेची निवडणुक लढवली गेली तर आम्हीही साथ देवु. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून जर विचारणा झाली तर आम्ही चर्चा करु. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हण यांच्याशी चर्चा करुन कॉंग्रेसच्या जागा ते तर शिवसेनेच्या जागा आम्ही ठरवु, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

पोलिसांची पाठऱाखण 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे वक्तव्य जबाबदार होते. त्याच्या अॅक्शनला रिअॅक्शन राज्यातून आली आहे, असे मंत्री देसाई म्हणाले.  ''कोणत्याही पोलिसांनी चुकीचे, बेकायदेशीर काम केलेले नाही. तीन-चार ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या. गुन्हे दाखल झाले. त्या कलमात ज्या तरतुदी आहेत. त्याला अनुसरुनच पोलिसांनी काम केले आहे. कोणतेही बेकायदेशीर कृत्य पोलिसांनी केलेले नाही, अशी पाठऱाखण त्यांनी केली.

Related Stories

No stories found.