प्रसाद लाड यांनी नवाब मलिकांच्या टीकेला दिलं उत्तर. मोदीविरोधकांचा घेतला समाचार..

नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. त्याला प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे.
Copy of Sarkarnama Banner (4).jpg
Copy of Sarkarnama Banner (4).jpg

मुंबई : भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड Prasad Lad यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक Nawab Malik आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. दोन दिवसापूवी नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. त्याला प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे. BJP leader Prasad Lad replied to Nawab Malik criticism

"समोरचा माणूस दुःखात असताना आपणही दुःखी होणे ही मानवी प्रकृती आहे, दुःखी माणसाचे सांत्वन करणे ही मानवी संस्कृती आहे. पण समोरचा माणूस दुःखी झाल्यावर त्याची टिंगल करणे ही विकृती आहे," अशी जळजळीत टीका राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी मोदी विरोधकांवर केली आहे. 

नुकतेच एका बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी, हा ठरवून केलेला कार्यक्रम होता का, अशी टीका केली होती.  त्या टिकेला लाड यांनी उत्तर दिले आहे. दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करणे ही विकृती आहे, असाही टोला त्यांनी मोदी विरोधकांना लगावला आहे. 

दुसऱ्याच्या दुःखामुळे आपणही दुःखी होण्याची प्रवृत्ती केवळ मनुष्यातच नव्हे तर जवळपास सर्वच सजिवांमध्येही आढळून येते. आपले पाळीव प्राणीदेखील मालकाची मनोवृत्ती ओळखून तंतोतंत तसेच वागतात. आनंदात असलेल्या माणसाच्या आनंदात सहभागी होऊन त्याचा आनंद वाढवणे आणि दुःखी असलेल्याचे सांत्वन करून त्याचे दुःख कमी करणे ही केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील सर्वांचीच संस्कृती आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर भावूक झालेल्या पंतप्रधान मोदी यांची टिंगल करणारे महाभाग हे आपण विकृत असल्याचेच दाखवून देत आहेत, अशा शब्दांत लाड यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. 

तासभराचे भाषण करताना चेहऱ्यावरची रेषाही न हलवणारे कठपुतली पंतप्रधान यापूर्वी आपल्या देशाने पाहिले आहेत. ते खरोखरच आपल्या पक्षाध्यक्षांच्या हातातील कठपुतली होते. त्यामुळे अतीवरिष्ठ नेत्यांनी कायद्याचा मसुदा फाडून टाकला तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील माशीदेखील हलत नसे. त्यांच्या मनातच जनतेबद्दल कोणत्याही भावभावना नसल्याचेच त्यातून दिसत असे. त्याचमुळे त्यांनी लोकांचे काहीही भले केले नाही. त्यातुलनेत जनतेच्या भावनांशी समरस होणारे पंतप्रधान मोदी हे जनतेला आपले वाटतात. जनतेप्रती प्रेम असलेले मोदी सबका भला करीत आहेत, असेही लाड यांनी दाखवून दिले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com