जागे व्हा ! हे पाहून तुमचे डोळे उघडले नाहीत, तर कान खेचावे लागतील!   - BJP leader Prasad Lad criticizes Mumbai Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

जागे व्हा ! हे पाहून तुमचे डोळे उघडले नाहीत, तर कान खेचावे लागतील!  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

तर मुंबईचे काय हाल होणार?

मुंबई : मुंबईत पुढील पाच दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या आठ तासात मुंबईतील बहुसंख्य  परिसरात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला. मुंबईसाठी पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. BJP leader Prasad Lad criticizes Mumbai Municipal Corporation

भाजपचे नेते प्रसाद लाड Prasad Lad यांनी मुंबई महापालिका bmc यांनी केलेल्या उपाययोजनांवर टिका करणारा एक व्हिडिओ टि्वट केला आहे. भांडुपच्या पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याचा हा व्हिडिओ आहे. आपल्या टि्वटमध्ये प्रसाद लाड म्हणतात की, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या भांडुप पम्पिंग स्टेशनची ही परिस्थिती असेल, तर मुंबईचे काय हाल होणार?  जागे व्हा ! हे पाहून तुमचे डोळे उघडले नाहीत, तर कान खेचावे लागतील! 

मुंबईत काही भागात मुसळधार; तर काही भागात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात आज (ता. १९) मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे; तर त्यापुढील तीन दिवस ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात सोमवारी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. कर्नाटक राज्याच्या दिशेने नैर्ऋत्येचे वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून पुढील काही दिवस पाऊस कोसळणार असल्याचे कुलाबा वेधशाळेचे डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले. मुंबई विविध ६० ठिकाणी महापालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर पावसाची नियमित नोंद घेतली जात आहे. आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील पालिकेच्या विविधा विभागांना देण्यात आल्या आहेत. 

स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित!
मुंबई : काँग्रेस नेत्यांच्या, प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रोजच्या भूमिका, विधाने आणि इशाऱ्यांमुळे गेल्या काही दिवस काँग्रेसच्या गोटात उत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना बोलावून काँग्रेसच्या मनात नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख